पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ट्विस्ट; नव्या हिंदुत्ववादी पक्षाची एन्ट्री

An organization called Hindu Samhati has announced a new party in West Bengal
An organization called Hindu Samhati has announced a new party in West Bengal

कोलकाता : यंदाची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक अतिशय रंजक होण्याची शक्याता आहे. तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) आणि भाजपा यांच्यात खरी लढत होण्याची चर्चा आहे. परंतु, आता एका नव्या पक्षाने या निवडणुकीतील आपला प्रवेश जाहीर केला आहे. खास गोष्ट म्हणजे हा पक्ष भाजपाचा 'खेळ' खराब करू शकतो अशा चर्चा आहेत. रविवारी ‘हिंदू समहति’ नावाच्या संस्थेने नवीन पक्षाची घोषणा केली आहे. या संघटनेने आपल्या पक्षाचे नाव ‘जन समहति’ असे ठेवले आहे. या पक्षाची नजर हिंदू मतदारांवर आहे. पक्षाने बंगालमधील किमान 170 जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे.


या हिंदू गटाने रविवारी आपला स्थापना दिन साजरा केला आणि त्याच दिवशी बंगालमध्ये निवडणुका लढवण्याची घोषणा केली. या संघटनेचा प्रभाव बंगालमधील बर्‍याच जिल्ह्यांमध्ये आहे. बंगालच्या दक्षिणेकडील भागात त्याची पकड विशेषतः मजबूत आहे. 2008 मध्ये तपन घोष यांनी या संस्थेची स्थापना केली होती. घोष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत.

भाजपबरोबर स्पर्धा

ही ‘हिंदू समहति’ भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आवाज उठवत आहे. सन 2017 मध्ये प्रथमच ही संघटना चर्चेत आली. त्यावेळी बासरीहार दंगली दरम्यान तपन घोष यांनी दोन अल्पवयीन मुलांना कायदेशीर मदत केली होती.  या पक्षाने शेवटच्या वळणावर म्हणजेच 2019 च्या निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दर्शविला होता. परंतु आता संघटनेने आपले मत बदलले आहे आणि ते केवळ भाजपाची व्होट बँकमध्ये कमी करण्यावर भर देत आहेत.

सध्या कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही

जन ‘जन समहति’चे अध्यक्ष देवतानू भट्टाचार्य म्हणाले, “आमचा हिंदू गट स्वतंत्र संघटना म्हणून काम करत राहील. राजकीय पक्ष म्हणून जनसमहतिची नोंद झाली आहे. आम्ही उत्तर बंगालमध्ये 40 आणि दक्षिण बंगालमध्ये 130 जागा लढवू. आत्ता तरी इतर पक्षांशी गठबंधन करण्याची आमची कोणतीही योजना नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला पाठिंबा दर्शविला होता, परंतु त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. हिंदूंचा भाजपावरील विश्वास कमी झाला आहे”.

'भाजपाचे खोटे आश्वासन'

देवतानू भट्टाचार्य पुढे म्हणाले, “नवीन नागरिकत्व कायदा आणि एनआरसीबाबत भाजप खोटी आश्वासने देत आहे. आसाम आणि त्रिपुराच्या अनेक हिंदू संघटना आमच्या संपर्कात आहेत. आसाममधील डिटेंशन कॅम्पमध्ये हिंदू मारले जात आहेत. बंगालमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची मागणी करणार्‍या मागास मातुआ समाजाला मतांसाठी प्यादे म्हणून वापरले जात आहे”.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com