मृत्यूचे तांडव संपेना! कर्नाटकात ऑक्सिजनअभवी पुन्हा 24 रुग्णांचा मृत्यू 

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंक लिक झाल्यामुळे 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अंत कर्नाटकात अशीच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटक : देशभरात कोरोना विषाणूच्या साथीने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालये भरून गेली आहेत, बेडस, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, औषधे यांचा तुटवडा निर्माण झाल्याने  देशातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. अशातच रोज नवनव्या घटना समोर येत आहेत. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ऑक्सिजन टॅंक लिक झाल्यामुळे 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर अंत कर्नाटकात अशीच घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. देशात मृत्यूचे चक्र सतत फीरताना दिसत आहे. कर्नाटकच्या चमराजनगर जिल्ह्यातील एका रुग्णालायत काल मध्यरात्री ऑक्सिजन अभावी 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे अडीचशे ऑक्सिजन सिलिंडर पाठविण्यात आले. 
(The orgy of death is not over! Another 24 patients die due to lack of oxygen in Karnataka) 

West Bengal Election: चंदना यांचा झोपडी ते विधानसभा प्रवास

चामराज येथील रुग्णालयाला बेल्लारीकडून ऑक्सिजन मिळणार होता, पण ऑक्सिजन येण्यास उशीर झाला आणि ऑक्सिजन अभावी या रुग्णांना आपले परम गमवावे लागले. ही सर्व रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजनचा पुरवठा संपल्यानंतर रुग्णांना त्रास होऊ लागला आणि वेळेत  ऑक्सिजन न मिळाल्याने या सर्व रुग्णांनी आपले प्राण गमावले. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. यापूर्वी कलबुर्गीतील केबीएन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच दिवशी यादगीर शासकीय रुग्णालयात लाईट कटमुळे व्हेंटिलेटरवरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. गेल्या एका आठवड्यात कर्नाटकातील बर्‍याच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी अनेक लोकांचा मृत्यू झाले आहेत. 

दरम्यान, सध्या कर्नाटकमधील कोरोना प्रकरणाची एकूण संख्या १6 लाखांवर गेली आहे. रविवारी, 37 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 217 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना संक्रमित बेड आणि ऑक्सिजनची कमतरता आहे. यापूर्वी दिल्लीतील बत्रा रुग्णालयातही ऑक्सिजनअभावी 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना महामारीमुळे देशात प्रचंड चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने राज्यसरकारांना लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सुचवले आहे. मात्र देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह राज्यसरकारांना कडक लॉकडाऊन लावण्याचा सल्ला आहे.   

संबंधित बातम्या