भारतीय जवानांची धडाकेबाज कामगिरी; चार दहशतवाद्यांचा खात्मा

भारतीय जवानांची धडाकेबाज कामगिरी; चार दहशतवाद्यांचा खात्मा
Outstanding performance of Indian soldiers Four terrorists killed

शोपिंया:(Outstanding performance of Indian soldiers Four terrorists killed) भारतीय जवानांनी जम्मू-काश्मीरमधील शोपियामध्ये धडाकेबाज कारवाई करत चार दहशवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियाच्या मनिहाल गावात चार दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले. काश्मीर पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी निगडित आहेत. काश्मीर पोलिस, भारतीय सेनेच्या 34 आरआर आणि सीआरपीफने मिळून ही कारवाई केली आहे. या मोहिमेमध्ये जवानांनी एके-47 रायफलसह तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. 

मागील आठवड्यात शोपियामधील रावलपोरा गावामध्ये भारतीय जवानांनी जैशचा कंमाडर सज्जाद अफगानी याला ठार केले होते. सज्जाद अफगानी जवळ आढळून आलेल्या चीनी बनावटीच्या 36 काडतूसांनी भारतीय जवानांना सतर्क केले होते. जवानांनी आपले बुलेटप्रुफ संरक्षण अधिकच मजबूत केलं आहे. भारतीय जवानांना आढळून आलेली काडतूसं सामान्य बुलेटप्रुफ वाहनांना आणि जवानांच्या बुलेटप्रुफ जॅकेटला भेदण्याची क्षमता ठेवतात.

भारतीय जवानांनी यावर्षी एकूण 19 दहशवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामधील 9 दहशवादी शोपीया जिल्ह्यामध्ये ठार करण्यात आले आहेत. यामध्य़े दोन टॉप कमांडरचा समावेश आहे. 


 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com