भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांवर ओवैसी यांची प्रतिक्रिया

भाजप कार्यकर्त्यांच्या हत्यांवर ओवैसी यांची प्रतिक्रिया
Owaisi's reaction to the killing of BJP workers

पाश्चिम बंगालच्या इतिहासात आजवर झालेल्या निवडणुका पाहता निवडणूक काळात होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना या पश्चिम बंगालसाठी नव्या नाहीत. पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल लागल्या नंतर सध्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे समजते आहे. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी या परिस्थितिबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाद्दूल मुस्लमीनचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या या घटनांवर प्रतिक्रिया दिली आहे. (Owaisi's reaction to the killing of BJP workers in west Bengal)

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भारतीय जनता पक्षाच्या 9 कार्यकर्त्यांच्या हत्त्या करण्यात आल्या असल्याचे भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात आले आहे. असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील या घटनांची निंदा केली आहे.

"जगण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. लोकांच्या जीविताचे संरक्षण करणे हे कोणत्याही सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. जर असे होत नसेल तर ते त्या सरकारचे अपयश आहे. देशातल्या कोणत्याही भागात लोकांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरलेल्या सरकारचा आम्ही निषेध करतो" अशी प्रतिक्रिया ओवैसी यांनी यावेळी दिली आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असल्याची माहिती पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी दिली आहे. तर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे स्वतः पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले असून त्यांनी या घटनांचा तीव्र निषेध केला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com