Oxygen Shortage : दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांचा मृत्यू; राहुल गांधींनी केंद्र सरकारला दिला असा सल्ला

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

काल रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पीटलमधील 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 200 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. 

नवी दिल्ली: देशात सगळीकडे कोरोना वाढतच आहेत परिस्थिती हाताळण्याचा शासन आणि प्रशासन प्रयत्न करतच असतांना ऑक्सिजनच्या तुटवड्याने आरोग्य विभागाची आणि जनतेच्या आडचणीत आणखी भर पडली आहे. अशातच काल रात्री ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने दिल्लीतल्या जयपूर गोल्डन हॉस्पीटलमधील 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 200 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यापैकी 80 रुग्ण ऑक्सिजनच्या सपोर्टवर असल्याचे पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेकडून सांगण्यात आलेलेआहे.

दरम्यान कोरोना व्हायरसमुळे वाढत चाललेल्या परिस्थितीत केरळमधील कॉंग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्ला केला आहे. राहुल गांधी म्हणाले की कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पीआर आणि अनावश्यक प्रकल्पांवर काम करण्याऐवजी केंद्र सरकारने लसी, ऑक्सिजन आणि इतर आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
राहुल गांधी यांनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केला. याआधी शुक्रवारी राहुल गांधी यांनी केंद्राच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर प्रश्न उपस्थित केला होता. "केंद्र सरकारला त्याचे प्राधान्य ठरवावे लागेल," असे वक्तव्य त्यांनी केले होते.

अयोध्या वादात न बोलणे शाहरूखने योग्य समजले 

सरकारने पीआरकडे लक्ष देणे बंद करा
"पीआर आणि अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन आणि इतर आरोग्य सेवांवर लक्ष देण्याची गरज आहे. हे संकट येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. या संकटाला सामोरं जाण्यासाठी देशाला तयार रहावे लागणार आहे. सध्याची दुर्दशा असह्य आहे!" असे आवाहन गांधी यांनी ट्विट करून केले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 46,4646,7866 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2,624 लोक मरण पावले. तथापि या काळात कोरोनामधून 2,19,838 रूग्ण बरे झाले आहेत.

Zydus Cadila च्या औषधाला भारतात परवानगी! 

संबंधित बातम्या