दिल्लीत ऑक्सिजन आभावी  12 रुग्णांचा मृत्यू...

दैनिक गोमंतक
शनिवार, 1 मे 2021

आज पुन्हा एकदा ऑक्सिजनचा तुटवडा भासल्यामुळे  12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये दिल्लीत अनेक समस्या कोरोना रुग्णांच्या जीवघेण्या ठरता आहेत. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना संक्रमण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोककडाऊन लागू केला आहे. मात्र तरीही दिल्लीतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यातच आज पुन्हा एकदा ऑक्सिजनचा तुटवडा भासल्यामुळे  12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.( Oxygen shortages in Delhi have killed 12 corona patients.)

कोरोना रुग्णालयांतील आगीचे सत्र थांबेना; गुजरातमध्ये 18 जणांचा मृत्यू

ऑक्सिजनचा (Oxygen) पुरवठा होत नसल्याने दिल्लीत (Delhi) अनेक रुग्णांचे जीव धोक्यात असल्याने दिल्लीतील बत्रा रुग्णालयाने न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे. न्यायालयात बत्रा रुग्णालयाने (Batra Hospital) सांगितले की," आम्हाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही. दुपारी 12 वाजेपर्यंत ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर थेट 1:30 वाजता ऑक्सिजन मिळाला. या दरम्यान काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये आमच्या एका डॉक्टरचा देखील समावेश आहे."  दरम्यान ही घटना घडली त्यावेळी रुग्णालयात 326 रुग्ण उपचार घेत होते. आम आदमी पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार राघव चड्ड यांनी आपले क्रोयोजिनिक टँकर रुग्णालयात येत असल्याची माहिती दिली होती, मात्र त्यापूर्वीच ऑक्सिजन अभावी 12 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्सिनच्या पुरवठ्याविषयी सुनावणी सुरू आहे. मागच्या काही दिवसांत न्यायालयाने दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारला या विषयावर अनेक वेळा फटकारले आहे. शनिवारी देखील या विषयावर सुनावणी झाली असून यावेळी न्यायालयाने दिल्ली सरकारला लष्कराची मदत घेण्याबद्दल विचार करण्यास सांगितले आहे.

 

संबंधित बातम्या