आज लोकसभेत पंतप्रधान मोदी-राहुल गांधी आमने सामने

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत आपले मत मांडू शकतात शकतात. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज लोकसभेत आपले मत मांडू शकतात शकतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल पंतप्रधान मोदी मोशन ऑफ थँक्सला उत्तर देणार आहेत, तर राहुल गांधी हे 1 फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा करणारे कॉंग्रेसचे पहिले वक्ते असतील. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील मोशन ऑफ थँक्सच्या प्रस्तावावर आपले मत मांडले आहे.

''सरकार शेतकऱ्यांना चिनी सैन्याप्रमाणे वागणूक देत आहे''

तत्पूर्वी, मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या लोकसभेची कार्यवाही बुधवारी पहाटे 1 वाजेपर्यंत चालू होती. खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल मोशन ऑफ थँक्सवरील चर्चेत भाग घेतला. राष्ट्रपती कोविंद यांनी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताच 29 जानेवारी रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले; बहुतेक विरोधी पक्षांनी, कृषी कायद्यांच्या विरोधात आणि निषेध करणार्‍या शेतकर्‍यांशी एकता दर्शविण्यासाठी या आभिभाषणावर बहिष्कार टाकला होता. अर्थसंकल्पीय सत्राचा पहिला भाग 13 फेब्रुवारीला संपेल, तर दुसरे सत्र 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल.

देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं माहितीय? अखिलेश यादवांचा पंतप्रधान मोदींना टोला

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी यांच्यानंतर राहुल गांधी लोकसभेत काँग्रेसच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करतील. तर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबद्दल पंतप्रधान मोदी मोशन ऑफ थँक्सवर उत्तर देतील. सोमवारी त्यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले.

संबंधित बातम्या