पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंदोलक शेतकऱ्यांशी साधणार संवाद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ डिसेंबरला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लाच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत.

लखनऊ  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २५ डिसेंबरला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लाच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत.  उत्तर प्रदेशात २,५०० पेक्षा जास्त ठिकाणी बीजेपी "किसनसंवाद" घेणार असल्याचं भाजपने म्हटलं आहे. शनिवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किसनसंवादासाठी तयारी सुरू केली असल्याचं सांगितलंय. 

 

"उत्तर प्रदेश भाजपाचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह आणि राष्ट्रीय नेते राधामोहन सिंग यांनी राज्यातील पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेतली. राधा मोहन सिंह म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार गरीब आणि शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. जर आधीच्या सरकारनी  शेतकऱ्यांसाठी कामं केली असती, तर शेतकऱ्यांवर ही परिस्थिती आलीच नसती." विरोधी पक्ष नवीन शेती कायद्यांबाबत खोटं बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या