पाकच्या घुसखोरीशी संबंध नाही

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

‘पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग होणे हे दहशतवाद्यांना भारतात घुसविण्यासाठीचे त्यांचे जुनेच धोरण आहे.

श्रीनगर

पूर्व लडाखमध्ये चीनबरोबरील तणाव वाढला असतानाच चीनकडून शस्त्रसंधी भंगाच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा संबंध लावण्याचे प्रयत्न काही माध्यमांकडून होत असताना लष्कराने मात्र या घटनांचा परस्परांशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. अर्थात, दोन्ही सीमांवर शत्रूंनी आगळीक केल्यास उत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही लष्कराने ठणकावून सांगितले आहे. ‘पाकिस्तानकडून शस्त्रसंधी भंग होणे हे दहशतवाद्यांना भारतात घुसविण्यासाठीचे त्यांचे जुनेच धोरण आहे. जगातील एकाच देशाला काश्‍मीर खोऱ्यात शांतता नको आहे, तो देश म्हणजे पाकिस्तान. मात्र, या घटनांचा चीनबरोबरील तणावाशी संबंध लावता येणार नाही,’ असे लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी सांगितले.

संबंधित बातम्या