... तर तेव्हा भारताची 8 विमाने पाडली असती, पाकिस्तानचे माजी हवाईदल प्रमुख बरळले

Pakistan news: पाकिस्तानचे माजी हवाईदल प्रमुख युद्धाची भाषा करतांना दिसत आहेत.
Pak Ex-Pak Air Chief Marshal Sohel Aman Khan
Pak Ex-Pak Air Chief Marshal Sohel Aman KhanDainik Gomantak

Ex-Pak Air Chief Marshal: पाकिस्तान सध्या आर्थिक समस्यांना सामोरे जात आहे. देशात बेरोजगारी, भुकमरी पायाभूत सुविधांचा अभाव, महागाई यामुळे सर्व सामान्य नागरिक मेटकुटीला आहेत.

याची जाणीव झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत केलेली तीन युद्धे महागात पडली असून यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट ओढवले अशी जाहीर कबुली दिली.

तसेच भारतासोबत चांगले संबंध देखील ठेवणे गरजेचे आहे असे सांगितले आहे. त्यांचे माजी हवाई दल प्रमुख युद्धाची भाषा करत आहे. त्यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या एयर स्ट्राईक वरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानचे माजी हवाई दल प्रमुख सोहेल अमन यांनी शनिवारी एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असतांना हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध जैसे थे राहण्याची शक्यता आहे.

सोहेल अमन म्हणाले, 'बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी आमच्या निशाण्यावर 8 भारतीय लढाऊ विमाने होती. पण आम्ही त्यातील फक्त एकच लढाऊ विमानं पाडले. कारण, आम्हाला दोन्ही देशांमधील तणावपूर्व परिस्थिती अजून वाढवायची नव्हती.'

Pak Ex-Pak Air Chief Marshal Sohel Aman Khan
Tejasvi Surya: इंडिगो विमानाचे इमर्जन्सी गेट उघडणारा तो प्रवासी भाजपचा खासदार?

सोहेल अमन यांच्या या वक्तव्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी तणाव पूर्ण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) सध्या आर्थिक मदतीसाठी अनेक देशांकडे हात पसरवत आहेत. पण त्यांना पाहिजे तशी मदत मिळेनाशी झाली आहे.

कर्जाचा डोंगर देखील वाढत असून देशातील महागाईने सर्व सामान्य नागरिक मेटकुटीला आहे. ही स्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे.

यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर भारतासोबत चांगले संबंध ही काळाची गरज असल्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते.

त्यांनी अल अरेबिया चॅनेलचा दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना आवाहन करतो की त्यांनी पाकिस्तानशी चर्चा करावी, भारत आणि पाकिस्तानचे प्रश्न चर्चेने सोडवू. भारत (India) आणि पाकिस्तान एकमेकांचे शेजारी आहोत.

शांततेत जगणे हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रगती करा किंवा एकमेकांशी लढून वेळ आणि साधनसंपत्ती वाया घालवावी हे आपल्यावर आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यात तीन युद्धे झाली आहेत आणि या युद्धामुळे आपल्या देशात गरिबी आणि बेरोजगारीत वाढ झाली आहे. आम्ही आमचा धडा शिकलो आहोत आणि आम्हाला शांततेने जगण्याची इच्छा आहे, असे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com