शशी थरूरांच्या इंग्रजीवर पाकिस्तानी कॉमेडियनने केलेला मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

तिरुवनंतपुरम चे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जातात. 'सेस्किपिडियन', 'पर्स्पेसिसिटी', 'गोंझो' अशा त्यांच्या शब्दांचा ते स्वत:चा एक थिसॉरस बनवू शकतात. 

कराची : तिरुवनंतपुरम चे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर हे त्यांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जातात. 'सेस्किपिडियन', 'पर्स्पेसिसिटी', 'गोंझो' अशा त्यांच्या शब्दांचा ते स्वत:चा एक थिसॉरस बनवू शकतात. या 'थरूरियन' इंग्रजीवर बर्‍याच वेळा, मीम्स आणि मजेदार व्हिडिओ बनवले जातात. इंटरनेटवर प्रसिद्ध असणारे शशी थरूर यांचे हे किस्से लोकांना हसवणण्याबरोबरच त्यांच्या शब्दभांडारात देखील भर पाडतात. शब्द न कळाल्यामुळे त्याचा नेमका अर्थ काय, तो कसा उच्चारायचा हेदेखील त्यांच्या फॉलोअर्सना कळतं. 

आता एक कोटी नवीन कुटुंबांना मिळणार विनामूल्य एलपीजी कनेक्शन; जाणून घ्या कसा करता येणार अर्ज

सध्या थरूर यांच्या या इंग्लिश ट्युटोरियलचा व्हिडिओ व्हयरल झाला आहे. पाकिस्तानच्या अकबर चौधरी नावाच्या कॉमेडियनने तयार केलेला हा एक मजेदार ट्यूटोरियल व्हिडिओ आहे. त्यात, तो थरूर ज्या प्रकारचे इंग्रजी बोलतात, तसं इंग्रजी कसं बोलायचं हे या व्हिडिओमधून सांगायचा प्रयत्न करत आहे. शशी थरूर यांच्या इंग्रजीवरील पाकिस्तानच्या कॉमेडियनने तयार केलेल्या या व्हिडिओला तुफान लाईक्स मिळत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

या मजेदार क्लिपला मायक्रोब्लॉगिंग साइटवर 1148 रिट्वीट आणि 7241 लाईकसह 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे. कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनीदेखील हा व्हिडिओ आपल्या प्रोफाईलवर व्हिडिओ पुन्हा शेअर केला. नेटीझन्सनी हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत यावर मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत. 

संबंधित बातम्या