पाणीपुरीवाल्यांचा झाला राडा, व्हिडिओ व्हायरल

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

उत्तरप्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बागपत : उत्तरप्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि या व्हायरल व्हिडीओचं कारणही तसंच हटके आहे. बागपतमधील एका पाणिपुरीवाल्याने दूसऱ्या पाणीपुरीवाल्याच्या ग्राहकाला इशाऱ्याने ठेल्याकडे बोलवले. आणि परत काय या दोघांमध्ये एकच वादाची ठणगी पडली. निर्माण झालेल्या वादातून बागपत पोलिसांनी आठ लोकांना अटक केली. अटक झाल्यानंतर त्यांचा पोलिस ठाण्यामधील एक फोटोही व्हायरल होत आहे. यामध्ये ते पोलिस ठाण्यामध्ये बसलेले दिसून येत आहेत. या फोटोवर बागपत जिल्ह्याचे कलेक्टर अवनीष शरण यांनी एक हटके, मजेदार रिऍक्शन दिली आहे. या फोटोमध्य़े दिसत असणाऱ्या मधल्या व्यक्तिला सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं आहे. काही नेटकऱ्यांनी त्य़ाला आइंनस्टाइन म्हटले तर काहींनी त्याला अंडरटेकर संबोधले.

सोशल मिडिया वापरण्याचे 'हे' नवे नियम माहिती आहेत का? 15 एप्रिलपासून...

याच व्यक्तीचा फोटो कलेक्टर अवनीष शरण यांनी आपल्या सोशल मिडिया आकाउंटवरुन शेअर करत त्याला ठाण्य़ात 'pawri' होत आहे. तर अनेक नेटकऱ्य़ांनी त्य़ांचे अनेक मीम्स बनवले आणि विनोद शेअर केले. काही नेटकऱ्यांनी त्याची तुलना अंडरटेकरशी केली. त्याच्या फोटोला 6000 पेक्षा अधिक लाइक्स भेटल्य़ा तर 300 पेक्षा रिट्विट मिळाले आहेत. लोक खूप मजेशीर कमेंट करत आहेत.

राजस्थान फिरायचंय? मग भारतीय रेल्वेच्या या पॅकेजेसचा नक्की विचार करा

सोमवारी दुपारच्यावेळी एक ग्राहक एका पाणीपुरीवाल्याकडे वळून जाताच दुसऱ्या पाणीपुरीवाल्याने आपले डोळे चमकवून आपल्याकडे बोलवले आणि त्याने आपल्या प्रतिस्पर्धी ठेल्यावाल्याला टोमणाही मारला. ग्राहकाला आपल्याकडे बोलवल्यानंतर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. आणि पाहता पाहता दोघांमध्ये मारामारीस सुरुवात झाली. आणि बाजारात हल्लकल्लोळ मजला दोन गटांमध्ये लाटीकाठ्यांनी मारामारी सुरु झाली. तर बघ्यांनी या मारीमारीचा आनंद लुटत व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. या बघ्यांमधील एकाने लगेच पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहचून भांडण करत आसणाऱ्यापैंकी आठ जणांना ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या