Monsoon Session: काँग्रेसच्या चार खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

Congress MPs: लोकसभेचे कामकाज उद्या 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
MPs
MPsDainik Gomantak

Monsoon Session: काँग्रेसच्या चार खासदारांनी लोकसभेत फलक घेऊन महागाईविरोधात घोषणाबाजी केल्याने त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज उद्या (26 जुलै रोजी) सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

दरम्यान, नियम 374 अन्वये काँग्रेसच्या (Congress) चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

MPs
Monsoon Session 2022: राहुल गांधी महागाई विरोधी आंदोलनात सामील, गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं

तत्पूर्वी, विरोधी खासदारांनी सोमवारी सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाईच्या (Inflation) मुद्यावर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली होती. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले. ओम बिर्ला म्हणाले, "हे लोकशाहीचे (Democracy) मंदिर आहे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे."

लोकसभा अध्यक्ष पुढे म्हणाले, "तुम्हाला चर्चा करायची असेल तर मी त्यासाठी तयार आहे, परंतु तुम्हाला सभागृहात फक्त फलक दाखवायचे असतील, तर तुम्ही दुपारी 3 नंतर सभागृहाबाहेर करु शकता. सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही.''

MPs
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात सभापतींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

दुसरीकडे, लोकसभा अध्यक्षांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, तर विरोधी खासदारांनी महागाई, एलपीजीच्या किमती आणि इतर मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजासाठी निलंबित करण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com