दिल्लीत काम सुरु असलेल्या एक्स्प्रेस-वेच्या पुलाचा काही भाग कोसळला

दिल्लीत काम सुरु असलेल्या एक्स्प्रेस-वेच्या पुलाचा काही भाग कोसळला
Bridge

गुरुग्राममध्ये द्वारका एक्स्प्रेस-वे एलिव्हेटेड हायवेचा काही भाग आज सकाळी कोसळल्याची माहिती मिळाली आहे. पुलाचा काही भाग कोसळला त्यावेळेस 10 ते 12 कर्मचारी कार्यरत होते. यातील काही कर्मचारी त्यामुळे जखमी झाल्याचे समजते. अपघातानंतर पोलिस आणि नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे  (एनएचएआयचे) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. व पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे.

गुरुग्राममध्ये द्वारका एक्स्प्रेस-वेच्या एका पुलाचे काम चालू आहे. आणि याच पुलाचा काही भाग आज खाली पडला. यानंतर पडलेल्या पुलाच्या खाली काही कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दोन कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुग्राममधील सेक्टर -106 दौलताबादजवळ ही घटना घडली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी द्वारका एक्स्प्रेस-वे च्या बांधकामाची पाहणी केली होती. नितीन गडकरी यांनी गुरुग्राममधील खेरकिडौला ते दिल्ली या दरम्यान द्वारका एक्स्प्रेस-वे मार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com