रुग्ण बरे होण्याचा दर 58.56 टक्के

Pib
सोमवार, 29 जून 2020

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.

नवी दिल्‍ली,

कोविड-19 चे व्यवस्थापन, प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने करत असलेल्या, सुनियोजित, पूर्वदक्षता घेऊन कालबद्ध, आणि सक्रीय प्रयत्नांचे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत.  

बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येतील तफावत आता  एक लाखांपेक्षा जास्त झाली आहे. आजपर्यंतच्या आकडेवारीनुसार,  सक्रीय रूग्णांपेक्षा  बरे झालेल्या रुग्णांची संख्या, 106,661  इतकी  जास्त झाली आहे. म्हणजेच,  आतापर्यंत, एकूण 3,09,712 रुग्ण कोविड-19 मधून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर, 58.56 टक्के इतका झाला आहे. गेल्या 24 तासांत, कोविडचे एकूण 13,832 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात, 2,03,051 सक्रीय रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. भारतात आता कोविड च्या निदानासाठी 1036 प्रयोगशाळा आहेत. यापैकी, 749 प्रयोगशाळा सरकारी, तर 287 खाजगी क्षेत्रात आहेत.

या प्रयोगशाळांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :--

• रियल टाईम –RT पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 567 (सरकारी: 362 + खाजगी: 205)

• TrueNat आधारित चाचणी प्रयोगशाळा: 382 (सरकारी :355 + खाजगी: 27)

• CBNAAT आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (सरकारी: 32 + खाजगी: 55)

सध्या दररोज 2,00,000 नमुन्यांची चाचणी केली जात आहे. गेल्या 24 तासांत चाचण्यांची संख्या 2,31,095 पर्यंत वाढली आहे. आतापर्यंत एकूण 82,27,802 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

28 जून 2020 पर्यंत,कोविड संबधित पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात आली असून, सध्या देशात  1055 समर्पित कोविड रुग्णालये आहेत. यात, 1,77,529 अलगीकरण खाटा, 23,168 आयसीयु खाटा आणि 78,060 ऑक्सिजन आधारित खाटा आहेत. त्याशिवाय, 2,400 समर्पित  कोविड हेल्थ सेन्टर्स असून त्यात  1,40,099 अलगीकरण खाटा, 11,508 आयसीयु खाटा आणि 51,371 ऑक्सिजन आधारित खाटा कार्यरत आहेत.

त्याशिवाय, देशात 9,519 कोविड केअर सेन्टर्स आहेत, जिथे 8,34,128 खाटा उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्रीय संस्थांना 187.43 लाख  N95 मास्क आणि 116.99 लाख पीपीई किट्स दिल्या आहेत. 

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in .

 

संबंधित बातम्या