रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 59.43 टक्क्यांवर पोहोचला

रुग्ण बरे होण्याचा दर वाढून 59.43 टक्क्यांवर पोहोचला

नवी दिल्ली, 

कोविड-19 च्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी भारत सरकारसह राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी उचललेल्या समन्वित पावलांमुळे आजमितीस सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण 1,27,864 पेक्षा जास्त आढळून आले आहेत. याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे झालेल्यांचे प्रमाण आणखी वाढून 59.43 टक्के झाले आहे. गेल्या 24 तासांत एकूण 13,157 कोविड-19 रूग्ण बरे झाले असून त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या 3,47,978 पर्यंतपोहोचली आहे.

सध्या 2,20,114 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.

देशातील चाचणी प्रयोगशाळांची संख्या आणखी वाढविण्यात आली आहे. शासकीय प्रयोगशाळांची संख्या 764 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 292 पर्यंत वाढली आहे ज्यामुळे देशात एकूण 1056 प्रयोगशाळा झाल्या आहेत. वर्गवारी खालीलप्रमाणे:

  • जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा: 576 (शासकीय: 365 + खाजगी: 211)
  • ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: 394 (शासकीय: 367 + खाजगी: 27)
  • सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 86 (शासकीय: 32 + खाजगी: 54)

नमुने तपासणीत दररोज सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2,17,931 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण 88,26,585 नमुने तपासण्यात आले आहेत.

कोविड -19 शी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/ आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 शी संबंधित तांत्रिक प्रश्न technicalquery.covid19@gov.in यावर तर इतर प्रश्न ncov2019@gov.in and @CovidIndiaSeva यावर पाठवू शकता.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com