रुग्ण बरे होण्याचा दर 63.24%

pib
बुधवार, 15 जुलै 2020

कोविड -19 संदर्भात काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड-19 वरील राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

नवी दिल्‍ली, 
गेल्या 24 तासात कोविड-19 च्या रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. 20,572 रुग्ण बरे झाले असून कोविड-19 च्या बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 5,92,031 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आज 63.24 % झाला आहे.

आग्रही चाचणी, वेळेवर निदान आणि गृह अलगीकरण किंवा रुग्णालयात सक्रिय वैद्यकीय सहाय्य याच्या माध्यमातून रूग्णांचे प्रभावी व्यवस्थापन केल्याने रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत आहे. कोविड-19 च्या  सक्रीय रुग्णांची संख्या 3,19,840 असून ते सर्व वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. ऑक्सिमेटरच्या वापरासह गृह अलगीकरणाचे सर्व निकष आणि मानकांमुळे रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांवर दबाव न आणता लक्षण नसलेल्या किंवा सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर देखरेख ठेवण्यास मदत झाली आहे.

बरे झालेल्या आणि सक्रीय रुग्णांमधील दरी सातत्याने वाढत आहे. आज हा आकडा 2,72,191 आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांच्या तुलनेत 1.85 पटींनी जास्त आहे.

भारतात कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी असलेल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये 1378 समर्पित कोविड रुग्णालये (डीसीएच), 3077 समर्पित कोविड आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि 10351 कोविड सुश्रुषा केंद्र (सीसीसी) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यासाठी एकूण 21,738 व्हेंटिलेटर, 46,487 आयसीयू खाटा आणि 1,65,361 ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा आहेत.

कोविड-19 चे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना 230.98 लाख एन95 मास्क, 123.56 लाख पीपीई आणि 11,660 व्हेंटिलेटरचे वितरण केले आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in  आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडीncov2019@gov.in

 

संबंधित बातम्या