पाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस!

पाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस!
patna.jpg

देशात कोरोनाची लाट (Covid19) ओसरत असताना दुसरकीडे मात्र ब्लॅक फंगसचं संकट कायम आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगसची (black fungus) लागण झाली आहे. ब्लॅक फंगसवरील उपचार महागडा असल्याने सर्वसामान्यांना तो परवडणारा नाही. त्यामुळे अनेकांनी या आजाराची धास्ती घेतली आहे. ब्लॅक फंगसमुळे अनेक रुग्णांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. असं असताना बिहारची (Bihar) राजधानी असणाऱ्या पाटण्यात (Patna) एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये (brain) ब्लॅक फंगसची लागण झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. त्याच्या मेंदूतून क्रिकेटच्या चेंडूइतका ब्लॅक फंगस काढण्यात आला आहे. एवढा मोठा ब्लॅक फंगस पाहिल्यानंतर डॉक्टरांनाही (doctor) मोठा धक्का बसला आहे. मात्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याने डॉक्टरांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला. (Patna Doctors remove brainn like black fungus from brain after surgery)

पाटण्यातील एका 60 वर्षीय व्यक्तीला ब्लॅक फंगसचा आजार झाला होता. त्याच्या मेंदूमध्ये या फंगसची लागण झाली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी त्वरित पाटण्यामधील गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये (Gandhi Institute of Medical Sciences) दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टर ब्रजेश कुमार यांच्या देखरेखीखाली डॉक्टरांनी तब्बल तीन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत त्याच्या मेंदूमधून क्रिकेटच्या चेंडूएवढा ब्लॅक फंगस काढला. आता शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

पाटण्यातील व्यक्तीला कोरोनातून ठीक झाल्यानंतर काहीसा थकवा जाणवत होता. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता  त्याला ब्लॅक फंगसची लागण झाल्याचे समोर आले. ब्लॅक फंगस त्याच्या नाकातून मेंदूपर्यंत पोहोचल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. मात्र सुदैवाने त्याच्या डोळ्याला काही इजा झाली नाही. शस्त्रक्रिया अधिकच गुंतागुंतीची होती. नाकावाटे ब्लॅक फंगस मेंदूपर्यंत पोहोचला होता. काही प्रमाणात डोळ्यांना स्पर्श झाल्याचे दिसून आले. तो मेंदूत वेगाने वाढत असल्याचे दिसून आल्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर तीन तास शस्त्रक्रिया केल्यानंतर तो ब्लॅक फंगस काढण्यात यश आले, असे डॉक्टरांनी सांगितले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com