'हिंदू आहे म्हणजे देशभक्तही आहेच'

PTI
रविवार, 3 जानेवारी 2021

भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे, असे महात्मा गांधी सांगायचे. हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

नवी दिल्ली :  भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे, असे महात्मा गांधी सांगायचे. हिंदू आहे म्हणजे त्याला देशभक्त असायलाच हवे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

‘मेकिंग ऑफ ए हिंदू पेट्रियॉट- बैकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज' पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते काल राजघाट परिसरात करण्यात आले. सामाजिक समीक्षण केंद्रातर्फे हर आनंद प्रकाशनाच्या सहकार्याने सदर शोधग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. देशभक्त ही संज्ञा मोजक्याच लोकांसाठी वापरायची, असे आम्ही कधीही मानत नाही. भारतात तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये या भूमीला पवित्र मानण्याची, आपले मानण्याची एक प्रवृत्ती आहे. भूमीच्या पावित्र्याची पूजा करण्याची प्रवृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये विविध रूपाने विद्यमान आहे. मात्र, महात्मा गांधीजी जे म्हणाले, ते विचार करण्यासारखे आहे- माझी देशभक्ती ही माझ्या धर्मातून आली आहे. त्यामुळे हिंदू आहे म्हणजे तो आपोआपच देशभक्तही आहेच, त्याला ते असायलाच हवे. भारतविरोधी अथवा भारतद्रोही असा कोणीही नसतो. त्यामुळे ‘हिंदू देशभक्त’ ही संज्ञा म्हणजे ‘वदतो व्याघात्’ असा प्रकार आहे, असे भागवत म्हणाले.

रतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे केवळ परकीय राजकीय सत्ता घालवणे, असे गांधीजींचे मत नसल्याचे  सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढा हा दोन संस्कृतींमधील संघर्ष म्हणजे पाश्चात्त्य संस्कृती विरुद्ध भारतीय संस्कृतीचा लढा होता. भारतीय संस्कृतीच्या पुनर्निर्माणाचा तो लढा होता, त्यासाठी भारतीयांना स्वत:मध्ये आमूलाग्र बदल घडवावा, असे त्यांचे मत होते. 

‘नथुराम गोडसे याच्याबाबतभागवतांचे म्हणणे काय?’

हैदराबाद : हिंदू आहे म्हणजे देशभक्तही आहेच. हिंदू कधी भारत विरोधी होऊ शकत नाही, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असद्दुद्दीन ओवेसी यांनी नथुराम गोडसे याच्याबद्धल काय मत आहे, असा प्रतिप्रश्‍न केला आहे.ओवेसी यांनी ट्‌विट करत सरसंघचालकांच्या मतांवर टीका केली आहे. आरएसएसची विचारसरणी निराधार असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘ मोहन भागवत हे माझ्या प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतील काय? महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे, नेल्ली हत्याकांडाला जबाबदार असणारे लोक, १९८४ ची शीखविरोधी दंगल आणि २००२ च्या गुजरात दंगलीमध्ये सहभागी झालेल्या लोकांबाबत ते काय सांगतील.’’

संबंधित बातम्या