रेल्वेस उशीर झाल्यास कंपनीला दंड

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

खासगी कंपन्यांसाठी रेल्वेकडून बिझनेस मॉडेलची नियमावली जाहीर

नवी दिल्ली: देशातील १०९ मार्गांवर खासगी उद्योगांकडून चालविण्यात येणाऱ्या प्रस्तावित रेल्वेगाड्यांच्या वेळा पाळण्याबाबत रेल्वेने दंडाची मेख मारुन ठेवली आहे. जर रेल्वेगाडी संबंधित कंपनीच्या चुकीमुळे वेळेच्या बऱ्याच आधी किंवा उशीरा पोहोचली तर संबधित कंपनीला मोठा दंड भरावा लागणार आहे. या कृतीमुळे खासगीकरणावरून उठलेले वादळ काहीसे शमेल अशी आशा आहे. 

नव्या बिझनेस मॉडेलबाबतची नियमावली रेल्वे बोर्डाने आज जाहीर केली. रेल्वेगाड्या चालविण्याचा लिलाव जिंकणाऱ्या कंपन्यांना आर्थिक नुकसान टाळायचे असेल तर दरवर्षी किमान ९५ टक्के वेळा पाळण्याची लेखी हमी द्यावी लागेल. त्याशिवाय एक टक्का कमी जरी वेळा पाळल्या गेल्या नाहीत तर संबंधित कंपनीला २०० किलोमीटरचा किंवा त्या गाडीच्या एकूण अंतराच्या १० पटीने किंवा प्रती किलोमीटर ५१२ रूपये इतका दंड भरावाच लागेल. दोन तासांपेक्षा गाडीला उशीर झाला तर हा दंड भरावा लागेल. 

कंपनी कार्यालयात रेल्वेचा प्रतिनिधी
या कंपन्याच्या कार्यालयांत रेल्वेचा एकेक प्रतिनिधी (अधिकारी) बसेल व तो कंपन्यांच्या रेल्वेबाबतच्या कारभाराची माहिती घेईल. जर खासगी गाडी एखाद्या स्थानकावर १० मिनिटे आधी पोहोचली तर कंपनीला १० किलोमीटरच्या मालवाहतुकीचे शुल्क भरावे लागेल. मात्र कोणत्याही कारणामुळे खासगी कंपनी प्रवासी गाडी रद्द करू शकणार नाही. अर्थात जर रेल्वेमुळे एखाद्या गाडीला सुटण्यास किंवा पोहोचण्यास विलंब झाला तर रेल्वेही तेवढ्या मालवाहतूक दराचा एक चतुर्थांश हिस्सा दंड म्हणून भरेल. 

india

संबंधित बातम्या