यूपी हिंसाचारात 357 जणांना अटक, या शहरात सर्वाधिक आरोपी गजाआड

उत्तरप्रदेशमध्ये 10 जून रोजी, भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्मांच्या विधानाच्या संदर्भात शुक्रवारच्या नमाजनंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये हिंसाचार आणि दगडफेक झाली.
UP Violence
UP ViolenceDainik Gomantak

UP Violence Arresting: उत्तरप्रदेशमध्ये 10 जून रोजी, भाजपमधून निलंबित केलेल्या नुपूर शर्मांच्या विधानाच्या संदर्भात शुक्रवारच्या नमाजनंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये हिंसाचार आणि दगडफेक झाली. तेव्हापासून यूपी पोलीस या बदमाशांची ओळख पटवून अटक करण्यामध्ये गुंतले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 357 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

16 जूनपर्यंतचा डेटा

यूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) प्रशांत कुमार यांनी सांगितले की, 16 जून रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत या प्रकरणात एकूण 357 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रयागराजमधून (Prayagraj) 97, सहारनपूरमधून 85, हाथरसमधून 55, मुरादाबादमधून 40, फिरोजाबादमधून 20 आणि आंबेडकरनगरमधून 41 जणांना अटक करण्यात आली आहे.

UP Violence
गोरखनाथ मंदिर हल्ल्याबाबत यूपी पोलीस आणि सरकारचा मोठा खुलासा

या शहरांमध्ये अटकही करण्यात आली

एडीजी प्रशांत कुमार यांनी पुढे सांगितले की, 'याशिवाय अलीगढमधील 6, लखीमपूर खेरीतील 8 आणि जालौनमधील 5 जणांना पोलिसांनी तुरुंगात पाठवले आहे.'

UP Violence
योगी आदित्यनाथ आणि भाजपच्या यूपी निवडणुकीत 'विजयाचा' अर्थ काय?

एकूण 13 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत

10 जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या गोंधळानंतर राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये एकूण 13 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यावेळी एकूण 13 पोलीस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये 5 वाहनांना आग लावली तर 3 ची तोडफोड केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com