"पश्चिम बंगालमध्ये गरजू लोकांना मिळणार कोरोनाची मोफत लस"- ममता बॅनर्जींची मोठी घोषणा 

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली.बंगालमधील सर्व गरजू लोकांना कोरोनाची मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली.बंगालमधील सर्व गरजू लोकांना कोरोनाची मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केली.राज्य सरकार लसीकरणाबाबत तयारी करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी ही घोषणा केली. यापूर्वी भाजपने बिहार निवडणूक प्रचारादरम्यान मोफत कोरोना लस उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.

याचीच पुनरावृत्ती ममता बॅनर्जी यांनी बंगाल निवडणूकीच्यावेळी केली आहे.देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरु होणार आहे.देशात लसीकरण होण्याअगोदरच ममतांनी कोरोनाची मोफत लस उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली.देशभरात पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना मोफत लस मिळणार आहे.त्यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मरचारी तसेच 50 वर्षावरील गंभीर आजारांनी पिडीत असणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

दरम्यान 16जानेवारीपासून देशात कोरोनाची लस देण्याची घोषणा झाली असता आता राज्यांनी ही कोरोनाची मोफत लस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.पश्चिम बंगालमध्ये 294 जागा असणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी एप्रील- मे महिन्यात मतदान होणार आहे.त्यामुळे ममता बॅनर्जींच्या मोफत कोरोना लस देण्याच्या घोषणेला चांगलच महत्त्व आलं आहे.राज्यात कोरोनाची लस मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी तयारी करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.मला ही घोषणा करत असताना खूप आंनद होत आहे,असही त्या म्हणाल्या.आत्तापर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधीतांची आकडा पाच कोटीच्या घरात गेला आहे.9881 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर दुसरीकडे सुमारे पाच लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे ममता बॅनर्जी यांची कोरोनाची लस मोफत देण्याच्या घोषणेला महत्व आलं आहे.ममता बॅनर्जी येणाऱ्या लस मोफत उपलब्ध देणार का? ही निवडणूका प्रचारातील फक्त घोषणाचं राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या