चित्रपटसृष्टीला बदनाम करणे थांबवा: जया बच्चन

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

जया बच्चन यांचे आवाहन; सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा छळ होतोय

बॉ लीवूडमधील अंमली पदार्थाच्या व्यापाराबद्दल भोजपुरी अभिनेते व भाजप खासदार रविकिशन यांनी काल केलेल्या टिप्पणीवर खासदार जया बच्चन यांनी आज राज्यसभेत संताप व्यक्त केला. त्यांनी, "जिस थाली मे खाते है, उस मे छेद करते है, ये गलत बात है'' अशा शब्दांत रवी किशन, कंगना राणावत आदींना फटकारले. 

दरम्यान, रविकिशन यांनी यावर जया बच्चन यांच्याकडून अशा टीकेची अपेक्षा नव्हती एवढीच प्रतिक्रिया दिली. शिवसेनेनेही बच्चन यांना पाठिंबा दिला आहे. दोन्ही कलाकारांचे नाव न घेता बच्चन म्हणाल्या, की कालच्या वक्तव्यामुळे मला लाजिरवाणे वाटत आहे. चित्रपट उद्योग दरदिवशी ५ लाख लोकांना थेटपणे तर ५ दशलक्ष लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार देतो. मात्र सरकारचा याला पाठिंबा नाही उलट सर्वाधिक कर भरणाऱ्यांचा छळच होतो. त्यात येथेच मोठे झालेले काही लोक सोशल मिडीयात बोलतात. काही लोकांमुळे चित्रपटसृष्टीला बदनाम करणे या लोकांनी थांबवावे.

स्वत:चा परिचय देण्याची गरज काय
जया बच्चन यांचे नाव पुकारल्यावर त्यांनी मास्क घालून बोलण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले. सभापती वेंकय्या नायडू यांनी, इतके सुंदर व्यक्तिमत्व आहे आणि तेवढेच नाव आहे त्यांचे.  हे नाव प्रसिद्ध आहे. त्यांना परिचय देण्याची गरज काय'', अशी टिप्पणी केली. तोच धागा पकडून बच्चन म्हणाल्या, की मी तुमची आभारी आहे. परंतु मला ज्यामुळे हे नाव मिळाले त्या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचे प्रकार सुरू आहेत.

संबंधित बातम्या