"पाणीपुरी विकणारे हिंदी बोलतात...": तामिळनाडूच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

देशात हिंदी (Hindi) भाषा राजभाषा असावी का नसावी यावरुन अजूनही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात वाद आहे.
"पाणीपुरी विकणारे हिंदी बोलतात...": तामिळनाडूच्या मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य
Minister. PonmudiDainik Gomantak

देशात हिंदी भाषा राजभाषा असावी का नसावी यावरुन अजूनही उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात वाद आहे. उत्तर भारतीय लोक हिंदीला राष्ट्रीय दर्जा देण्यासाठी भांडत आहेत. तर दुसरीकडे, दक्षिण भारतातील खास करुन तामिळनाडू मधील लोक हिंदीला प्रखर विरोध करतात. (People who speak Hindi sell Panipuri a controversial statement of Tamil Nadu ministers)

यातच आता तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री के. पोनमुडी (Minister. Ponmudi) यांनी शुक्रवारी सांगितले की, 'राज्य सरकार आपले द्विभाषिक धोरण कायम ठेवणार आहे. यासोबतच कथितपणे हिंदी लादण्याचा उत्तर भारतीयांचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.' त्याचबरोबर हिंदी (Hindi) भाषा शिकल्याने रोजगार मिळेल या दाव्यावरही मंत्रिमहोदयांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी मंत्र्यांनी शहरात पाणीपुरी विकणाऱ्यांची भाषा हिंदी असल्याचे सांगितले. हिंदी शिकणाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचा आग्रह धरणाऱ्यांवर निशाणा साधत मंत्र्यांनी विचारले की, 'शहरात पाणीपुरीवाले कोण आहेत?'

Minister. Ponmudi
'...मध्यप्रदेशातही राष्ट्रगीत अनिवार्य होऊ शकते': गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

दरम्यान, मंत्र्यांनी हिंदी लादण्याच्या विरोधात सत्ताधारी द्रविड मुनेत्र कशम (DMK) च्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. रवी म्हणाले, "कोणत्याही व्यक्तीवर हिंदी किंवा इतर कोणतीही भाषा लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही." पोनमुडी म्हणाले की, ''आम्ही भाषेच्या मुद्द्यावर तामिळनाडूची लोकभावना अधोरेखित करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला. राज्यपाल याबाबत केंद्राला अवगत करतील. तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) इंग्रजी आणि तमिळ भाषेचा वापर केला जातो. आणि तो यापुढेही सुरु राहणार आहे. विद्यार्थी (Student) हिंदीसह इतर भाषा शिकण्याच्या विरोधात नाहीत. तुम्ही हिंदी शिकलात तर तुम्हाला नोकरी मिळेल. ही परिस्थिती आहे का... कोईम्बतूरमध्ये पाहा कोण विकतोय पाणीपुरी. हे ते ( Hindi speaking) लोक आहेत.''

दुसरीकडे, नव्या शैक्षणिक धोरणातील चांगल्या योजना स्वीकारण्यास राज्य सरकार तयार आहे, मात्र हिंदी लादू नये. विद्यार्थी तिसरा पर्याय म्हणून कोणतीही भाषा निवडू शकतील, मात्र सध्याच्या व्यवस्थेचे पालन राज्य सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Minister. Ponmudi
उत्तर प्रदेशमध्ये मदरशात राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य

तसेच, आपल्या भाषणात, रवी यांनी हिंदी लादण्याच्या पोनमुडीच्या दाव्याचे खंडन केले. तमिळ भाषेची समृद्धी अधोरेखित केली. ते म्हणाले, “काही लोकांकडून असा आभास निर्माण केला जात आहे की, केंद्र सरकार तामिळनाडूवर किंवा कोणावरही भाषा लादत आहे. मला वाटते की हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे योग्य नाही.

ते पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण भर मातृभाषा आणि प्रादेशिक भाषेतील शिक्षणावर आहे. नुकत्याच झालेल्या सरन्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी प्रादेशिक भाषा ही राज्य आणि न्यायव्यवस्थेची भाषा करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. ते पुढे म्हणाले, 'जे न्याय मिळवण्यासाठी जातात, त्यांना समजेल त्या भाषेत न्याय मिळाला पाहिजे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.