Corona Vaccination झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूची शक्यता 11पटींनी कमी

अमेरिकेचे (America)अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी लसीकरणाबाबतचे (Vaccination)नवे धोरण जाहीर केले आहे.ज्या कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही 100 हून अधिक आहे त्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे.
Corona Vaccination झालेल्या व्यक्तींच्या मृत्यूची शक्यता 11पटींनी कमी
Corona vaccineDainik Gomantak

वॉशिग्टन : ज्या नागरिकांनी आता पर्यंत कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यूची शक्यता ही 11 पटींनी कमी होते. तसेच रुग्णालयात जाण्याची शक्यताही 10 पटींनी कमी आहे. असे अमेरिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या एका अहवालात सांगितले आहे.

यूएस सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन (US Centers for Disease Control and Prevention) यांच्या वतीने कोरोना लसीकरणासंबंधी महत्त्वाचे तीन अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यामध्ये एका अहवालात असे सांगण्यात आले आहे की, ज्या नागरिकांनी आता पर्यंत कोरोनाचे दोन्ही डोस घेतले नाहीत. आणि कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत दोन्ही डोस घेतलेले नागरिक अधिक सुरक्षित आहेत. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची कोरोनामुळे मृत्यूची शक्यता 11 पटींनी कमी होते. तसेच त्यांच्या रुग्णालयात भरती होण्याची शक्यताही 10 पटींनी कमी होते.

Corona vaccine
हा ठरला लहान मुलांचे लसीकरण करणारा जगातला पहिला देश

लसीच्या प्रभावाची तुलना करताना डेल्टा व्हेरिएंटविरोधात(Delta variant) इतर लसींच्या तुलनेत मॉडर्नाची लस ही अधिक प्रभावी आहे असे अहवालात सांगण्यात आले आहे. डेल्टा व्हेरिेंटविरोधात मॉडर्नाची लस 95 टक्के प्रभावी आहे.तसेच फायझर लस ही 80 टक्के प्रभावी आहे. आणि जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ही लस देखील 60 टक्के प्रभावी असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden)यांनी लसीकरणाबाबतचे नवे धोरण जाहीर केले आहे. अमेरिकेमध्ये ज्या कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही 100 हून अधिक आहे त्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करावे. आणि दर आठवड्याला त्यांची कोरोनाची चाचणी करावी असाही आदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com