SpiceJetच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल, विमानसेवा थांबवण्याची मागणी

खाजगी विमान कंपनी स्पाइसजेटचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.
SpiceJet
SpiceJetDainik Gomantak

खाजगी विमान कंपनी स्पाइसजेटचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. आधी स्पाईसजेटच्या विमानांमधील तांत्रिक बिघाडाचे प्रकरण आणि नंतर कंपनीच्या चेअरमनविरुद्धचा फौजदारी तपास अद्याप पूर्णपणे निकाली निघाला नव्हता की आता या विमानांच्या ऑपरेशनबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे अशी माहिती समोर येत आहे. (Petition filed in Delhi High Court against SpiceJet)

SpiceJet
मनी लाँड्रिंग प्रकरणी मंत्री सत्येंद्र जैन अडचणीत, पूनम जैन यांची ईडी चौकशी सुरु

स्पाइसजेटच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांची प्रकरणे समोर आल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) याचिका दाखल करण्यात आली, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण सरकारचे आहे, उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे न्यायालयाने सुनावनीदरम्यान म्हटले आहे.

स्पाईसजेटच्या विमानांची उड्डाणे रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली, या याचिकेत स्पाइसजेट एअरलाइन्सच्या उड्डाणांमध्ये नुकत्याच झालेल्या व्यत्ययाच्या घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे. वकील राहुल भारद्वाज यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.

SpiceJet
Sahibabad | 1.20 कोटीचे हेरॉईन सह तीन तस्करांना अटक

अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे

अॅडव्होकेट राहुल भारद्वाज यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत स्पाइसजेटचे कामकाज व्यवस्थितपणे चालवले जात आहे की नाही हे तपासण्यासाठी घटनांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली तसेच स्पाईसजेटच्या चेअरमनविरोधातही फौजदारी चौकशी सुरू असल्याचे जनहित याचिकेत यावेळी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अडीच महिन्यांत 16 फ्लाइट्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत तर यातील अनेक विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले तर अनेकांना लँडिंगनंतर टेक ऑफ करता आलेले नाहीये. तर यातील सर्वाधिक समस्या स्पाइसजेटच्या विमानांमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com