Fuel Price : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेल पुन्हा वाढले 

दैनिक गोमन्तक
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

देशात मागील तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये थांबलेली दरवाढ आज पुन्हा सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

देशात मागील तीन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये थांबलेली दरवाढ आज पुन्हा सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. त्यानंतर आज राजधानी दिल्लीमधील पेट्रोलचे दर 91 रुपये लीटरच्या पुढे गेल्या आहेत. तेल विपणन कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 91.17 रुपये झाली आहे. तर डिझेल 81.47 रुपये प्रतिलिटरवर पोहचले आहे. दिल्लीत पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 15 पैशांनी वाढले आहे.

सावधान! या सार्वजनिक बँकांमध्ये आपले खाते असल्यास, हे काम त्वरित करा, अन्यथा 1...

यानंतर देशातील चार महानगरांपैकी महाराष्ट्रातील मुंबईत सर्वात महाग पेट्रोल झाले आहे. आज झालेल्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 97.57 रुपयांवर, तर डिझेल 88.60 रुपये प्रतिलिटर वर गेले आहे. मुंबईत आज पेट्रोल 23 पैशांनी आणि डिझेल 16 पैशांनी वाढले. त्यानंतर कोलकाता मध्ये पेट्रोल 91.35 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 84.35 रुपये लिटर झाले आहे. आणि चेन्नईत पेट्रोल 93.11 रुपये व डिझेल 86.45 रुपये लिटर झाले आहे. 

Goa Budget 2021: गोवा अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून

देशात 2, 6, 7, 21, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी इंधनाच्या किमतीत दरवाढ झाली नव्हती. आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल एसएमएस सेवेअंतर्गत RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड लिहून 9224992249 या नंबरवर मेसेज पाठविल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेता येणार आहेत.     

संबंधित बातम्या