"रावणाच्या लंकेत पेट्रोल स्वस्त,मात्र रामराज्यात महाग का ?"

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

   केंद्रीय  मंत्री  निर्मला  सीतारामन  यांनी  कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर  सोमवारी  अर्थसंकल्प माडंला. या  अर्थसंकल्पात  पायाभूत  क्षेत्रांच्या  विकासासाठी  पेट्रोल  आणि  डिझेल  वर उपकर  आकारण्यात  आले  आहेत.

नवी दिल्ली:  केंद्रीय  मंत्री  निर्मला  सीतारामन  यांनी  कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर  सोमवारी  अर्थसंकल्प माडंला. या  अर्थसंकल्पात  पायाभूत  क्षेत्रांच्या  विकासासाठी  पेट्रोल  आणि  डिझेल  वर उपकर  आकारण्यात  आले  आहेत. पेट्रोलवर  प्रति  अडीच  रुपये  उपकर  आकारण्यात आला तसेच  डिझेलवर  प्रति  चार  रुपये  एवढा  उपकर  आकारण्यात  येणार आहे. मात्र  कोरोनाच्या  काळात  मध्यमवर्गाला  अधिच  फटका  बसला  असला असताना  आता  नवीन  अधिभाराचा  भुर्दंड  सोसावा  लागणार  आहे.

निर्गुंतवणुकीवर भर, करचुकवेगिरीला आळा

दरम्यान  केंद्र  सरकार  कडून सांगण्यात  येत आहे  की, उत्पादन  शुल्कात  झालेल्या  कपातीमुळे  वाढीव  अधिभाराचा फटका  बसणार नाही. पेट्रोल  आणि  डिझेल  यांवरिल  उत्पादन शुल्क  आणि  अतिरिक्त  उत्पादन  शुल्क  हे  कमी  करण्यात  आले  आहेत. मात्र केंद्र सरकारने आकारलेल्या  वाढीव  उपकरामुळे  आता  मध्यमवर्गासहीत  इतर  अनेक स्तरातून  मोदी  सरकारला  विरोध होत आहे. यातच  आता  भाजपला भाजपमधूनच  विरोध  होत  आहे. भाजपचे  राज्यसभेतील  खासदार  सुब्रमण्यम स्वामी यांनी  या  वाढीव  आकारलेल्या  उपकराला  विरोध  केला  आहे.

UnionBudget2021: सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे फसवणूक - काँग्रेस

सध्या  राज्यातील  मुंबई  शहराबरोबर  अनेक  शहरात  पेट्रोल  प्रति  93  रुपये  तर  डिझेल   83  रुपये  एवढे  दर  वाढले  आहेत. सीतारामन  यांनी  मांडलेल्य़ा  अर्थसंकल्पावर मध्यमवर्ग,  शेतकरी  या  घटकांनी मात्र  नाराजी  व्यक्त  केली  आहे. तसेच  मोदी  सरकारने  पुढच्या  वर्षी  शिक्षणावर  करण्यात  येणाऱ्या  खर्चात  तब्बल  6000  कोटी रुपयांची  कपात  केली  आहे. मात्र  अर्थमंत्र्यांनी  लसीकरणासाठी  काही  रक्कम  राखून ठेवण्यात  आली  आहे  असे  सांगितले. दरम्यान  विरोधकांकडून  या  अर्थसंकल्पावर  जोरदार टिका  करण्य़ात  येत  आहे. आगामी  काळात  पश्चिम  बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ या  राज्यातील  विधानसभा  निवडणूका  लक्षात  घेवून  या  राज्यांसाठी  विशेष  तरतूदी करण्यात  आल्या  आहेत.       

संबंधित बातम्या