NIA RAID: केरळपासून ते तामिळनाडूपर्यंत पीएफआयचे तीव्र निदर्शने

PFI चे केरळ सरचिटणीस ए अब्दुल सतार यांनी आरोप केला आहे की RSS-नियंत्रित फॅसिस्ट सरकार असंतोषाचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर करत आहे.
NIA RAID
NIA RAIDDainik Gomantak

केंद्रीय एजन्सींच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) ने केरळमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत संप पुकारला आहे. यादरम्यान प्रचंड गदारोळ झाल्याची मीहिती मिळत आहे. केरळपासून तामिळनाडूपर्यंत तोडफोड केली जात आहे. तमिळनाडूतील भाजपच्या कार्यालयावरही हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. कोचीमध्ये सरकारी बसेसला टार्गेट करून तोडफोड करण्यात आली आहे. तसेच तिरुअनंतपुरममध्ये तोडफोड झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

एनआयएच्या नेतृत्वाखालील विविध एजन्सींनी त्यांची कार्यालये, नेत्यांची घरे आणि इतर परिसरांवर टाकलेल्या छाप्यांविरोधात पीएफआय कार्यकर्ते केरळमध्ये निदर्शने करत आहेत. देशातील दहशतवादी कारवायांसाठी कथितपणे निधी पुरवल्याप्रकरणी पीएफआयवर हे छापे टाकण्यात आले होते.

एका पीएफआय सदस्याने सांगितले की त्यांच्या राज्य समितीला असे आढळून आले की संघटनेच्या नेत्यांची अटक "राज्य प्रायोजित दहशतवादाचा" भाग आहे. पीएफआयचे राज्य सरचिटणीस ए अब्दुल सतार म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियंत्रणाखालील फॅसिस्ट सरकारने केंद्रीय एजन्सीचा वापर करून विरोधाचा आवाज दाबण्याच्या प्रयत्नाविरोधात राज्यात 23 सप्टेंबर रोजी संप पुकारला जाईल. " सकाळी सहा वाजल्यापासून संप सुरू होणार असून, सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केरळमध्येही गुरुवारी निदर्शने झाली

गुरुवारी सकाळी एनआयए आणि इतर गुप्तचर यंत्रणांनी देशभरात उपस्थित असलेल्या फिफीच्या कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी छापे टाकल्याची बातमी येताच पीएफआय कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी छापे टाकले होते. त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पीएफआयच्या एका सूत्राने सांगितले की, तिरुअनंतपुरम, कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम आणि त्रिशूरसह जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये निदर्शने झाली. “मुख्यतः (PFI) राज्य आणि जिल्हा समित्यांच्या कार्यालयांवर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले, असे सूत्राने सांगितले. जरी सुरुवातीला आम्हाला असे वाटले की अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत, परंतु नंतर आम्हाला कळले की ही कारवाई ईडीने नाही, तर एनआयए आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या इतर तपास यंत्रणांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com