"देवभूमीतले भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाहीमुळे त्रस्त"

"देवभूमीतले भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाहीमुळे त्रस्त"
piyush goyal.jpg

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केरळमध्ये मैदानात उतरलेले दिसता आहेत. त्यातच केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पीयूष गोयल यांनी केरळ मध्ये अस्तित्वात असलेल्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) च्या  केरळ सरकारवर भ्रष्टाचार, घराणेशाही आणि जातीयवादाचे गंभीर आरोप केले आहेत.(Piyush Gol said that Devbhoomi is plagued by corruption, crime and nepotism) 

केरळमध्ये भारतीय जनता पक्ष, डावी लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पक्षात तिरंगी लढत असल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी यावेळी राज्याच्या परिस्थितीवर टीका केली. यूडीएफ आणि एलडीएफवर आरोप करत "दोन्ही आघाडय़ा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, यूडीएफ सौर घोटाळ्यामध्ये गुंतलेले आहेत आणि एलडीएफ सोन्याच्या घोटाळ्यामध्ये सामील आहे. त्यामुळे केरळमधील लोकांना यापुढे त्यांना स्वीकारणार नाही." असे मत पियुष गोयल यांनी व्यक्त केले आहे. केरळ ही देवभूमी आहे, मात्र या भूमीतले लोक भ्रष्टाचार, घराणेशाही, जातीयवाद आणि गुन्हेगारी सारख्या समस्यांमुळे त्रस्त आहे. 

शबरीमाला प्रकरणात केरळ (kerala) सरकारने घेतलेली घेतलेल्या भूमिकेवर सुद्धा पियुष गोयल यांनी टीका केली.  तसेच पुढे ते म्हणाले की, आयटी उद्योगाचे केंद्र बनण्यासाठी, सेवांसाठी, औद्योगिकीकरणाची आणि पर्यटनाची प्रचंड क्षमता असलेले हे राज्य विकासाच्या शर्यतीत मात्र हरले आहे. लोकांनी या सरकारला लोकांची सेवा करण्याची संधी दिली होती मात्र, डाव्या लोकशाही आघाडीने (LDF) फक्त राजकीय फायदा घेण्याचे काम केल्याचा देखील आरोप पियुष गोयल यांनी केला. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com