भारतीय सुरक्षा सल्लागारांच्या जीवाला धोका; पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ल्याचं प्लानिंग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

शाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांचा सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिकजवळ डोभाल यांच्या ऑफिसमध्ये हेटाळणी व्हिडिओ मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवी दिल्ली: देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांचा सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.  जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिकजवळ डोभाल यांच्या ऑफिसमध्ये हेटाळणी व्हिडिओ मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काश्मीरमधील शोपिया येथील रहिवासी असलेल्या मलिकला 6 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, दहशतवादीने आपल्या पाक-आधारित हँडलरच्या निर्देशानुसार सरदार पटेल भवन आणि राजधानीतील इतर महत्वाच्या ठीकाणांची टेहाळणी केली होती..

मागील वर्षी दहशतवाद्याने टेहाळणी केल्याचे सांगण्यात येत आहे. मलिक यांनी डोभाल यांच्या कार्यालय आणि श्रीनगरमधील इतर भागांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि ते पाकिस्तानातल्या आपल्या हँडलरना पाठवले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले गेले आहे. 2016 मध्ये उरी सर्जिकल स्ट्राईक आणि 2019 मधील बालाकोट हवाई हल्ल्यापासून डोभाल हे पाकिस्तानकडून कार्यरत दहशतवादी गटांचे लक्ष्य आहे.

भूकंपामुळे हादरले दिल्लीकर; त्यात आज सकाळी धुक्याने केला कहर -

दिल्ली आणि श्रीनगरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की दहशतवाद्याच्या चौकशीदरम्यान डोभालच्या कार्यालयाच्या व्हिडिओविषयी माहिती समोर आली आहे. जम्मूच्या गंग्याळ पोलिस स्टेशनमध्ये मलिकविरूद्ध कलम 18 अंतर्गतआणि 20 युएपी कायद्यान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लश्कर-ए-मुस्तफा या जैश मोर्चाच्या प्रमुख असलेल्या मलिकला अनंतनागमधून अटक करण्यात आले होते. त्याच्यासोबत सापडलेले काही शस्त्रे व दारूगोळा सुध्दा जप्त करण्यात आला होता.

मुघल आणि ब्रिटीश वास्तुकलेचा अप्रतिम नजराणा म्हणजे दिल्लीचं मुघल गार्डन ! -

 

 

संबंधित बातम्या