पाटण्यात बळीराजाचा आक्रोश

दैनिक गोमन्तक
बुधवार, 30 डिसेंबर 2020

पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला.

पाटणा: पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान महासभा आणि डाव्या संघटनांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्याचे नियोजन आखले होते. गांधी मैदानापासून राजभवनाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांना डाक बंगला परिसरामध्ये रोखून धरले होते. राजभवन येथून ४ किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडून राजभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी 
झाले .

सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. राजभवनाच्या दिशेने जाणारा मार्च रोखणे हा देखील एक प्रकारचा अन्यायच आहे. आम्हाला राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यायचे होते, असे अखिल भारतीय किसान महासभेचे बिहारचे सचिव रामाधार सिंह यांनी सांगितले.

आणखी वाचा:

‘दिल्लीमध्ये बसून शेती करता येणार नाही,’ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांचा मोदी सरकारला टोला -

 

संबंधित बातम्या