चार शेतकरी नेत्यांच्या हत्येचा कट उधळला

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

केंद्रसरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेची बारावी फेरीसुध्दा निष्फळ ठरली.

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरुन केंद्रसरकार आणि शेतकरी नेते यांच्यात तोडगा निघत नसताना शेतकरी नेत्यांना गेल्या काही दिवसांपासून धमकीचे सतत कॉल येत आहेत.

केंद्रसरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेची बारावी फेरीसुध्दा निष्फळ ठरली. येत्या प्रजासत्ताक दिनी आंदेलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीत ट्रक्टर मार्च काढण्याची तयारी झाल्याचे सांगितले आहे. मात्र हा ट्रक्टर मार्च उधळून लावण्यासाठी आघाडीच्या चार शेतकरी नेत्यांच्य़ा हत्तेचा कट रचण्यात आला आहे. आंदोलनस्थळी या चार आरोपींना पकडण्यात आले आहे. हत्त्येचा कट रचण्यात आले असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी आरोपींना पकडण्यात आल्यानंतर त्यांना माध्यमांसमोर आणण्यात आले. त्यांचा चेहरा या दरम्यान झाकण्यात आला होता.’’ प्रजासत्ताक दिनी काढण्यात येणाऱ्या शेतकरी मार्च उधळून लावण्यासाठी कट रचण्यात आला होता. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आमच्या टीममधील काही लोक पोलिसांची वेषभूषा करुन शेतकऱ्यांच्या ट्रक्टर मार्च मध्ये घुसणार होते. व्यासपीठावर असणाऱ्या चार शेतकरी नेत्यांचे फोटो आम्हांला देण्यात आले होते. आणि हे सगळे आम्हाला सांगितले होते तो एक पोलिस असल्याचे आरोपीने खळबळजनक खुलासा केला आहे’’.

 

पुढेही आरोपी म्हणाला, ''आमचे दोन गट करण्यात आले होते. आणि ते 19 जानेवारीपासून आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही पाहरा देत होतो. शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी शस्त्र बाळगतात का याचा शोध घेण्यात येत आसल्याचे त्याने सांगितले. 26 जानेवारीला शेतकऱ्यांच्या मार्चला रोखण्यात येणार होते. त्यानंतर ते न थांबल्यास त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. आणि ज्या चार शेतकर्यांना मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्या शेतकऱ्यांचा फोटो पोलिसाने दिला होता. त्य़ाचं नाव प्रदीप सिंह असे असून तो राई पोसिस ठाण्यात सध्या कार्यरत आहे.’’ अशी माहिती आरोपीने दिली आहे.

संबंधित बातम्या