पुलवामासारख्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलाने उधळला; जम्मू बसस्थानकातून 7 किलो स्फोटके जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं झालेली असतानाच, आज दहशतवाद्यांचा असाट कट सुरक्षा दलाने उधळून लावला.

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं झालेली असतानाच, आज दहशतवाद्यांचा असाट कट सुरक्षा दलाने उधळून लावला. जम्मू येथील बसस्थानकाजवळ आज सुरक्षा दलाकडून 7 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांच्या मागे दहशतवाद्यांचे षडयंत्र असल्याचा अंदाज आहे. यामध्ये कोणत्या संघटनेचा हात हे, याबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही. जम्मू विभागाचे पोलिस महासंचालक मुकेश सिंह आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात सविस्तर माहिती देतील.

Pulwama Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण; भारताने गमावले 40 जवान

सविस्तर माहिती देत आहोत..

 

संबंधित बातम्या