'आमच्या जवानांकडे अशी शस्त्रे असतील ज्याचा शत्रूंनी...': PM Modi

Navy Swavlamban Program: भारतीय सैन्यात आत्मनिर्भरता हे लक्ष्य 21 व्या शतकातील भारतासाठी खूप महत्वाचे आहे.
PM Modi
PM Modi Dainik Gomantak

PM Modi In Navy Program: भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या नेव्हल इनोव्हेशन अँड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन (NIIO) च्या 'स्वावलंबन' (Swavlamban) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दाखल झाले. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले की, भारतीय सैन्यात आत्मनिर्भरता हे लक्ष्य 21 व्या शतकातील भारतासाठी खूप महत्वाचे आहे. स्वावलंबी नौदलासाठी प्रथम स्वावलंबी चर्चासत्र आयोजित करणे हे या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

नौदलाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले, “आम्ही अगदी साध्या उत्पादनांसाठीही परदेशी देशांवर अवलंबून राहण्याची सवय लावली आहे. अमली पदार्थांच्या व्यसनाधीन व्यक्तींप्रमाणे आम्हालाही परदेशातून उत्पादने आयात करण्याची सवय होती. ही मानसिकता बदलण्यासाठी आम्ही 2014 नंतर 'सबका प्रयास' च्या मदतीने संरक्षणाची एक नवीन इकोसिस्टम तयार करण्यासाठी मिशन मोडवर काम केले." ते पुढे म्हणाले, "आमच्याकडे प्रतिभा नाही असे नाही. आमच्यात प्रतिभा आहे. माझ्या सैनिकांना जगाकडे असलेली 10 शस्त्रे घेऊन मैदानात उतरु दे... मी ती रिस्क घेऊ शकत नाही. माझ्या जवानाकडे ते शस्त्र असेल ज्याचा प्रतिस्पर्ध्यांनी विचारही केला नसेल."

PM Modi
PM Modi ‘उद्यमी भारत’ कार्यक्रमात घेणार भाग, एमएसएमई क्षेत्राला गती देण्यासाठी करणार योजना सुरू

नौदलाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणखी काय म्हणाले?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत आम्ही केवळ संरक्षणाचे बजेट वाढवलेले नाही, तर हा अर्थसंकल्प (Budget) देशातीलच संरक्षण उत्पादन इको-सिस्टमच्या विकासासाठीही उपयुक्त ठरला पाहिजे याची काळजी घेतली आहे. आज संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी निश्चित केलेल्या बजेटचा मोठा हिस्सा भारतीय कंपन्यांकडून खरेदी करण्यात खर्च केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com