पंतप्रधान मोदींना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार कोरोनाची लस ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरणाच्या दुसर्‍या फेरीत कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरणाच्या दुसर्‍या फेरीत कोरोनाची लस मिळण्याची शक्यता आहे. 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या राजकारण्यांना पुढील टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार असल्याचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले.

पोलिस,आरोग्य कर्मचारी आणि महानगरपालिका कर्मचारी यांसारख्या कोरोनायोद्ध्यांनंतर, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्पात 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि त्यानंतरच्या टप्प्यात 50 वर्षांखालील पण अनेक व्याधींचा सामना करणाऱ्या रूग्णांना लस देण्यात येईल.

राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं अभिनंदन करत पंतप्रधान मोदी म्हणाले..

"भारतात उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग यांसारखे आजार पाश्चिमात्य लोकसंख्येच्या तुलनेत कमी वयातच आढळतात. त्यामुळे 50 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य देणे योग्य ठरेल", असे पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष के श्रीनाथ रेड्डी यांनी सांगितले.

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या महिन्याच्या सुरुवातीला सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफोर्ड कोविड - 19 कोविशील्ड व भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मान्यता दिली आहे. भारतात होणारी लसीकरण मोहिम हा जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम ठरणार आहे.

देशाची अर्थव्यवस्था रुळावर येतेय; वीजमागणीत विक्रमी वाढ 

 

संबंधित बातम्या