
Prahlad Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी आपल्या संघटनेच्या मागण्यांसाठी जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. ते ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशन (AIFPSDF) चे उपाध्यक्ष आहेत. प्रल्हाद मोदी यांच्यासह संघटनेचे इतर अनेक सदस्यही हातात पोस्टर घेऊन जंतरमंतरवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. एआयएफपीएसडीएफचे अध्यक्ष बिश्वंभर बसू यांनी आपल्या नऊ कलमी मागण्यांबाबत पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे सांगितले आहे. तसेच बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘पश्चिम बंगाल मॉडेल’ लागू करण्याची मागणी
रास्त धान्य दुकानात तांदूळ, गहू, साखर तसेच खाद्यतेल आणि डाळींचे नुकसान झाल्यास भरपाई द्यावी, अशी AIFPSDF ची मागणी आहे. मोफत राशन वितरणाचे 'पश्चिम बंगाल (West Bengal) राशन मॉडेल' देशभरात लागू करावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरसह (Jammu And Kashmir) सर्व राज्यांची थकबाकी लवकरात लवकर द्यावी, अशीही मागणी संघटना करत आहे.
दुसरीकडे, बसू म्हणाले, 'खाद्यतेल, डाळी आणि एलपीजी गॅसचा पुरवठा रास्त धान्य दुकानातूनच झाला पाहिजे. याशिवाय ग्रामीण भागातील रास्त धान्य व्यापाऱ्यांनाही थेट तांदूळ आणि गहू खरेदी करण्याचा अधिकार मिळावा. टीएमसी (TMC) खासदार सौगता रॉय यांनीही आपल्या मागण्या संसदेत मांडल्या होत्या.'
पीएम मोदींचे बंधू राशन दुकान चालवतात
प्रल्हाद मोदी (Prahlad Modi) हे राशन दुकान चालवतात. राशन व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राशन डीलर्संना मिळणारे कमिशन खूपच कमी असून सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. कोरोना काळात राशन विक्रेते जीव धोक्यात घालून सर्वांपर्यंत राशन पोहोचवत होते, अशा परिस्थितीत त्यांनाही 'कोरोना योद्धा' म्हणून घोषित करावे, असेही ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.