यावर्षीही पंतप्रधान मोदींची दिवाळी सैनिकांबरोबरच

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

पंतप्रधान मोदी यांनी यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय  घेतला. त्यानुसार सीमेवर जाऊन त्यांनी सैनिकांना संबोधितही केले.

जयपूर - राजस्थानमधील जैसलमेर येथे  पंतप्रधान मोदी यांनी यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय  घेतला. त्यानुसार सीमेवर जाऊन त्यांनी सैनिकांना संबोधितही केले. यावेळी भाषण करताना त्यांनी म्हटले की, देशाच्या सीमांवर सैनिक आहेत, त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. सैनिकांमुळेच आपण देशात उत्सव आनंदात साजरे करू शकत आहोत. मी आज माझ्याकडूनच नाही तर सबंध देशवासियांकडून सर्व सैनिकांना दिपावलीच्या शुभेच्छा देतो, असे ते यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 

 मोदी यांनी सैनिकांशी संवाद साधताना पुढे म्हटले की,  देशातील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये अथवा उष्ण वाळवंटांमध्ये राहा. सैनिकांमध्ये आल्यावरच माझी दिवाळी संपन्न झाल्याचे समाधान मला लाभते. सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह बघून  माझाही आनंद आणि उत्साह द्विगुणित होतो, असेही ते यावेळी मोदी म्हणाले.
  

संबंधित बातम्या