" लसीकरणाची मोहीम सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोंदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोमवार संवाद"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

"लसीकरण मोहिमेसाठी लसवितरणाची प्रक्रीया योग्य रितीने व्हावी यासाठी राज्यांचा सहभाग कशापध्दतीने घेता येईल यासाठी पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत".

दिल्ली : कोरोना लसीकरणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे.लसीकरणाच्या मोहीमेची तारीख घोषीत करण्यात आली नसली तरी 13 जानेवारीनंतर लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

मात्र त्यापूर्वी लसीकरणासंबंधी आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोमवार संवाद साधणार आहेत.डीजीसीआयने आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिटय़ूटच्या 'कोवीशिल्ड' आणि भारत बायोटेकने बनवलेल्या covaxin लसींना मंजूरी दिली आहे.मात्र लसींच्या किंमती आणि पुरवठ्याबाबतची हमी अजूनही निश्चित झालेली नाही.

भारतात बनत असलेल्या या दोन लसींची मागणी जगभरातून होत असल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकारी सांगत आहेत.त्याचबरोबर या लसींचा लाभ जास्तीत जास्त गरजू लोकांना मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचही सांगण्यात येत आहे."लसीकरण मोहिमेसाठी लसवितरणाची प्रक्रीया योग्य रितीने व्हावी यासाठी राज्यांचा सहभाग कशापध्दतीने घेता येईल यासाठी पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत".सगळ्या राज्यांनी ड्राय रन पूर्ण केलं आहे.संबंधी चाचणी यशस्वी झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आहे.

संबंधित बातम्या