
Ram Mandir in Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराची रामभक्त मागील अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. जस-जसा जानेवारी 2024 महिना जवळ येत आहे तशी रामभक्तांची उत्सुकता वाढत चालली आहे.
एशियानेट न्यूज नेटवर्कच्या राजेश कालरा यांच्याशी एका विशेष मुलाखतीत, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आणि भारताच्या पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी प्रकल्पाच्या आध्यात्मिक महत्त्वाविषयी किस्सा शेअर केला आहे.
भव्य राममंदिर पूर्णत्वाच्या अगदी जवळ येत असताना, मिश्रा यांनी बांधकामादरम्यान आलेल्या विविध आव्हानांविषयी सांगितले.
दुसरीकडे, या महत्त्वाकांक्षी प्रयत्नाच्या आर्थिक पैलूकडे कोणीही दुर्लक्ष करु शकत नाही. ट्रस्टने यशस्वीरित्या 3500 कोटी रुपये जमा केले आहेत. ही खरचं मोठी गोष्ट आहे.
रामभक्तांनी सढळ हातांनी राममंदिराच्या उभारणीसाठी हा निधी दिला. मिश्रा यांनी नमूद केले की, रामभक्तांनी आपल्याला जमले तशी आर्थिक मदत दिली.
भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी त्यांच्या या योगदानाचा मोठा फायदा होणार आहे.
राममंदिर प्रकल्पाच्या उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्याकडून अव्यक्त प्रेरणा मिळाली. मिश्रा पुढे म्हणाले की, "सर्वात प्रेरणादायी गोष्ट म्हणजे निर्णय घेण्याच्या, बांधकामाच्या आणि प्रगतीच्या या संपूर्ण प्रक्रियेत कुठेतरी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अव्यक्त प्रेरणा होती."
प्रकल्पाच्या दैनंदिन कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पंतप्रधानांचा थेट सहभाग नसला तरी, प्रत्येक वीट आणि टाकलेल्या प्रत्येक पावलावर त्यांची उपस्थिती जाणवते, असे मिश्रा यांनी नमूद केले. ते निरीक्षण करत नव्हते, परंतु मला खात्री आहे की त्यांना येथे काय घडत आहे याबद्दल नक्कीच माहिती असेल, असेही ते पुढे म्हणाले.
मिश्रा पुढे म्हणाले की, "ही आमच्यासाठीही समाधानाची बाब आहे की एक दिवस ते प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठा करतील. त्याचबरोबर लाखो लोकांचा असा विश्वास आहे की, राममंदिराच्या उभारणीत त्यांचा मोठा हातभार लागला आहे."
राममंदिर ही केवळ भौतिक रचना नसून प्रभू रामाच्या वारशावर विश्वास ठेवणाऱ्या लाखो लोकांच्या श्रद्धा आणि दृढनिश्चयाचा जिवंत पुरावा आहे. भव्य मंदिर हे संस्कृतीचे पुनर्जागरण आणि अध्यात्माचे पुनरुत्थान आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.