पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांशी बुधवारी पुन्हा चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

देशातील सर्वाधिक १० कोरोना प्रभावित राज्यांनी आपापल्या भागांतील परिस्थिती नियंत्रणात आणली तरी देश कोरोनाविरुद्धची लढाई लवकरात लवकर जिंकेल असे मोदी यांनी नुकतेच म्हटले होते.

नवी दिल्ली: कोविड साथीचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रासह देशातील सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (ता. २३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. 

देशातील सर्वाधिक १० कोरोना प्रभावित राज्यांनी आपापल्या भागांतील परिस्थिती नियंत्रणात आणली तरी देश कोरोनाविरुद्धची लढाई लवकरात लवकर जिंकेल असे मोदी यांनी नुकतेच म्हटले होते. एकूण रुग्णसंख्येच्या ६० टक्के रूग्ण केवळ पाच राज्यांतून आहेत व मृत्यूही पाचच राज्यांतून झाले आहेत. दोन्ही बाबींत महाराष्ट्राला सर्वाधिक नुकसान झाले आहे. 

या पार्श्‍वभूमीवर बुधवारच्या चर्चेत पंतप्रधान या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना नियंत्रणाबाबत पुन्हा चर्चा करतील. दिल्लीसह महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात व आंध्र प्रदेश या राज्यांच्या आवश्‍यकता तसेच केंद्राकडून अपेक्षित वैद्यकीय मदत आणि मिळालेली मदत या बाबींचा ते आढावा घेतील. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या