PM मोदींनी शेअर केले गुजरातमधील 'ड्रोन शो' चे नयनरम्य दृश्ये

PM Modi in Gujarat: गुजरातच्या इतिहासात पहिल्यांदाच ड्रोन शो आयोजित करण्यात आला आहे.
Gujrat |Ahmedabad
Gujrat |Ahmedabad Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर 36 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करणार आहे. बुधवारी म्हणजेच (28 सप्टेंबरला) संध्याकाळी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटवर ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता. गुजरातच्या इतिहासात पहिल्यांदाच ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता.

ड्रोन शोचे फोटो शेअर केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) 29 आणि 30 सप्टेंबरला गुजरातला दौऱ्यावर असणार आहेत. तेथे ते 29,600 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत.. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, यादरम्यान ते गुरुवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 36 व्या राष्ट्रीय खेळांना सुरुवात करतील. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवरही पंतप्रधानांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीची झलक

नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते 36 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन होणार आहे. याआधी बुधवारी संध्याकाळी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटवर ड्रोन शो (Drone) आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राष्ट्रीय खेळांच्या प्रतिकांसह स्टॅच्यू ऑफ युनिटीचे प्रदर्शन करण्यात आले.

Gujrat |Ahmedabad
New Attorney General Of India: R Venkataramani बनले देशाचे नवे महाधिवक्ता

ड्रोन शोची तयारी पाहून पंतप्रधान मोदी थक्क झाले.राष्ट्रीय खेळ सुरू होण्यापूर्वी ड्रोन शो अहमदाबाद शहरातील मोटेरा भागातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता एका भव्य समारंभात मोदी 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या उद्घाटनाची घोषणा करतील. 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय खेळ होणार आहेत.

अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटवर ड्रोन शोचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर 36 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन होणार आहे. याआधी बुधवारी संध्याकाळी अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंटवर ड्रोन शो आयोजित करण्यात आला होता.

मोदी गुजरातला 29 हजार कोटींची भेट देणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 सप्टेंबरला गुजरातला भेट देणार आहेत. तेथे ते 29,600 कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com