PM Modi Gujarat Visit: PM मोदी आज तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, पहिल्या वाहतूक विमान प्रकल्पाची करणार पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील वडोदरा येथे C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्लांटची पायाभरणी करणार आहेत.
PM Modi
PM ModiDainik Gomantak

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र (PM Modi) मोदी आज म्हणजेच 30 ऑक्टोबरला महत्त्वाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तीन दिवसांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून ते गुजरातला पोहोचणार आहेत. रविवारीच पंतप्रधान मोदी वडोदरा येथे देशातील पहिल्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट प्लांटची (Transport aircraft manufacturing plant) पायाभरणी करणार आहेत.

या प्लांटमध्ये C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टचे उत्पादन सुरू होईल. हे एक मध्यम उंचीचे लष्करी वाहतूक विमान असेल. स्पेनची एअरबस डिफेन्स कंपनी आणि टाटा कन्सोर्टियम मिळून हा प्लांट सुरू करत आहेत.

  • आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

भारतात सुरु होणारा हा प्लांट स्वतःच खास असेल कारण C-295 विमान युरोपबाहेर बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचबरोबर देशात प्रथमच एक खाजगी कंपनी हे वाहतूक विमान बनवणार आहे. भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे एक मजबूत पाऊल मानले जात आहे. 

भारताने (India) गेल्या वर्षी स्पॅनिश कंपनीसोबत 56 सी-295 लष्करी वाहतूक विमानांसाठी करार केला होता. या कराराअंतर्गत एअरबस कंपनीकडून 16 विमाने थेट खरेदी केली जाणार असून 40 विमाने भारतीय प्लांटमध्ये तयार केली जाणार आहेत. C-295 हे भारतीय हवाई दलाच्या जुन्या वाहतूक विमान एव्ह्रोची जागा घेईल.

विमानाची वैशिष्ट्ये

C-295 लष्करी वाहतूक विमान 5 ते 10 टन पेलोड वाहून नेऊ शकते आणि सुमारे 11 तास उडू शकते. ते 71 सैनिकांना (50 पॅराट्रूपर्स) एकाच वेळी युद्धभूमीवर नेण्यास सक्षम आहे. 

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे संभाव्य वेळापत्रक

  • पंतप्रधान मोदी (PM Modi) रविवारी दुपारी 2.30 वाजता वडोदरा येथील लेप्रसी ग्राउंडवर C-295 मिलिटरी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टच्या प्लांटची पायाभरणी करतील.

  • सोमवारी (31 ऑक्टोबर) पंतप्रधान मोदी सकाळी 8 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पहार अर्पण करतील. 

  • केवडिया येथील परेड ग्राऊंडवर रात्री 8.15 वाजता राष्ट्रीय एकता दिवस परेड काढण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.

  • PM मोदी सकाळी 11 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे 'आरंभ 2022' कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

  • पीएम मोदी दुपारी 3.30 वाजता बनासकांठामधील थारेड येथे विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. 

  • पंतप्रधान मोदी गुजरातमध्येच रात्रीची विश्रांती घेतील. 

  • मंगळवारी (1 नोव्हेंबर) पंतप्रधान मोदी त्यांच्या गुजरात दौऱ्यातून थोडा वेळ काढून राजस्थानमधील मानगड धामला भेट देतील. या दिवशी 11 वाजता ते मानगड धामला राष्ट्रीय महत्त्वाचा वारसा म्हणून घोषित करतील. 

  • ते दुपारी 1.30 वाजता गुजरातमधील जांबुघोडा येथे विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. 

  • अहमदाबाद येथील महात्मा मंदिर येथून संध्याकाळी 6 वाजता दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित केला जाईल , ज्यामध्ये पंतप्रधान मोदी गुजरातमधील 182 विधानसभांच्या भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com