पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६ वाजता करणार देशाला संबोधित

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता भारतीयांशी बोलणार आहेत. ते कोणता विषयावर भाष्य करतील याकडे सबंध देशवासियांचे लक्ष लागले आहे. 

 नवी दिल्ली-  देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत आहे. बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहेत. सीमेवरील वाद कमी होताना दिसत नाही आहेत. अशा परिस्थितीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता भारतीयांशी बोलणार आहेत. ते कोणता विषयावर भाष्य करतील याकडे सबंध देशवासियांचे लक्ष लागले आहे. 

तसे ट्वीट करून त्यांनी याबद्दल माहिती देताना आपण आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली.

काही दिवसांपूर्वी देशातील काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना  प्रचंड नुकसान सहन करावे लागले. विशेषत: महाराष्ट्र आणि तेलंगणा  या राज्यांमध्ये जास्त हानी झाली आहे. त्यामुळे यासाठी ते काही पॅकेज जाहीर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजून आता प्रचारालाही सुरूवात झाली आहे. त्यामुळे ते निवडणूक समोर असल्याने तेथील नागरिकांना आकर्षिण्यासाठी त्या अनुषंगानेही काही महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान करू शकतात. त्यामुळे पंतप्रधानांचे हे संबोधन अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे.   
    

संबंधित बातम्या