पंतप्रधान मोदींचा व्हॅलेंटाईन केरळ-तमीळनाडूत!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2021 रोजी तामिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहे. सकाळी 11.15 च्या सुमारास पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2021 रोजी तामिळनाडू आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहे. सकाळी 11.15 च्या सुमारास पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. व चेन्नई येथे अर्जुन मेन बॅटल टँकला (एमके1A) सुपूर्द करणार असेही म्हटले जात आहे. आज पहाटे साडेतीन वाजता पंतप्रधान कोची येथे विविध प्रकल्पांची पयाभरणी करणार आहे. या प्रकल्पांमुळे या राज्यांच्या विकास वाढीच्या मार्गाला महत्त्व प्राप्त  होणार असे सांगण्यात येत आहे. 

पंतप्रधान 3770 लाख रुपये खर्चून पूर्ण झालेल्या चेन्नई मेट्रो रेल फेज मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.  वॉशरमेनपेट ते विंबको नगर पर्यंत मेट्रो प्रवासी सेवा सुरू केली आहे. उत्तर चेन्नई विमानतळ आणि मध्य रेल्वे स्थानकाशी 9.05 किमी लांबीचा हा मेट्रो ट्रॅक जोडला गेला आहे.

पंतप्रधान चेन्नई बीच ते अट्टीपट्टू दरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. 293.40  कोटी रुपये खर्च या मार्गाला आला आहे. 228 किमी लांबीचा हा मार्ग चेन्नई आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातून जातो आणि त्यामुळे चेन्नई बंदरातून  होणारी वाहतूक सुलभ होणार आहे. हा मार्ग चेन्नई बंदर आणि एन्नोर बंदरला जोडतो आणि हा मार्ग मेजर यार्डमधून जातो.

पंतप्रधान विल्लुपुरम- कुडलोर - मईलादुथुराई - तंजावर आणि मयिलादुथुराई-तिरुवारूर मधील एकल लाइन विभागाच्या रेल्वे विद्युतीकरणाचे उद्घाटन देखील करणार आहेत. या उपक्रमास 243 करोड रूपये खर्च करण्यात आले आहे. या विद्युतीकरणामुळे चेन्नई एग्मोर आणि कन्याकुमारी या मार्गात बदल न करता वाहतुकीचा प्रवास सुरू होणार आहे. परिणामी दिवसाला इंधन खर्चावर 14.61 लाख रुपयांची बचत होणार आहे.

पंतप्रधान ग्रँड अ‍ॅनिकट कॅनाल सिस्टमच्या विस्तार, नूतनीकरणाच्या आणि आधुनिकीकरणासाठी पायाभरणी करणार आहेत. डेल्टा जिल्ह्यात सिंचनासाठी कालवा महत्वाचा आहे. या कालव्याचे आधुनिकीकरण 2,640 कोटी रुपये खर्च करून कालव्याचे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेत सुधारणा होणार आहे. या कार्यक्रमास राज्यपाल आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

TRP गैरव्यवहार : अर्णब गोस्वामीसह पाच जणांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा -

संबंधित बातम्या