PM मोदींच्या संपत्तीत 26 लाखांनी वाढ, 'गांधीनगरची जमीन केली दान'

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात 26 लाख रुपयांनी वाढ झाली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत एका वर्षात 26 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. पीएमओने दिलेल्या ताज्या माहितीमध्ये ही बाब समोर आली आहे. यानुसार पंतप्रधानांकडे एकूण 2.23 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यातील बहुतांश बँकांमध्ये ठेवी आहेत. पीएम मोदींकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. कारण त्यांनी गांधीनगरमधील त्यांच्या वाट्याची जमीन दान केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) वेबसाइटवर दिलेल्या ताज्या माहितीनुसार, मोदींचे बॉन्ड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात (Mutual Funds) कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांच्याकडे चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत 1.73 लाख रुपये आहे. मोदींच्या जंगम मालमत्तेत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 23.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे, परंतु त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.

PM Narendra Modi
शेतकऱ्यांकडून 'पंतप्रधान मोदीं'च्या 'मन की बात'चा थाळ्या वाजवून निषेध

पीएमओच्या वेबसाइटनुसार, 31 मार्च 2022 पर्यंत, मोदींकडे 2,23,82,504 एवढी संपत्ती आहे. गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री असताना मोदींनी ऑक्टोबर 2022 मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. ती इतर तिघांसह संयुक्तपणे मालकीची होती. त्यात सर्वांचा समान वाटा होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com