पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिमला दौऱ्यावर, गरीब कल्याण संमेलनात होणार सहभागी

सकाळी 11 वाजता पंतप्रधान गरीब कल्याण संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याण संमेलन मध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम) अंतर्गत आर्थिक लाभाचा 11 वा हफ्ता जारी करण्यासाठी मंगळवारी म्हणजे आज हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) शिमला येथे दाखल होणार आहेत. (PM Narendra Modi is going to Shimla today to participate in Garib Kalyan Sammelan)

Prime Minister Narendra Modi
अखिलेश यादव यांनी योगी सरकारच्या बजेटवर उपस्थित केले प्रश्न

सकाळी 11 वाजता पंतप्रधान गरीब कल्याण संमेलनात देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल हा अभिनव सार्वजनिक कार्यक्रम देशभरात राज्यांची राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रावर आयोजित करण्यात आला आहे, असे पीएमओ कार्यालयाने सांगितले आहे.

देशभरातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सरकारव्दारे चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांबद्दल जनतेशी थेट संवाद संवाध साधणार आहेत.मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य आणि इतर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सकाळी 9.45 वाजता गरीब कल्याण संमेलन सुरु होईल ज्यामध्ये पंतप्रधान मोदी थेट जनतेशी संवाद साधतील.

सकाळी 11 वाजता, पंतप्रधान कार्यक्रमात सामील झाल्यानंतर, विविध राज्य आणि स्थानिक स्तरावरील कार्यक्रमांना कव्हरेज करण्यात येईल आणि संमेलन राष्ट्रीय स्तरावर होईल. संमेलनादरम्याण, पंतप्रधान भारत सरकारच्या नऊ मंत्रालये आणि त्यातील विभागांच्या विविध कार्यक्रमांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा 11 वा हफ्ता देखील यावेळी जारी करणार आहेत. यावेळी सुमारे रक्कम हस्तांतरित करणे देखील शक्य होईल. तसेच 10 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना 21,000 कोटींची वाटप केली जाणार आहे. यावेळी पंतप्रधान देशभरातीलच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com