मिझोरामच्या 'चिते लुई' नदीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, हे कसे घडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात नदीकिनाऱ्यांवरील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला.
MANN KI BAAT
MANN KI BAATDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमात नदीकिनाऱ्यांवरील अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. 'कचऱ्यातून कमाई' करण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी मिझोराममधील 'चिटे लुई' या नदीचे उदाहरण यावेळी दिले. वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत राहिल्याने येथे घाण व कचऱ्याचे ढीग पडले असल्याचे त्यांनी यावेळी प्रखरतेने सांगितले. (PM Narendra Modi raised the issue of unsanitary conditions on river banks in his Mann Ki Baat program)

MANN KI BAAT
शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्राकडून 'Y+' सुरक्षा

मात्र काही लोकांनी येथील कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याची संधी पाहून स्वच्छता सुरू केली असल्याचे ही मोदींनी सांगितले. यादरम्यान नदी आणि तिच्या काठातून बाहेर पडणारा प्लास्टिक आणि पॉलिथिनचा कचरा रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पीएम मोदींनी पुद्दुचेरीच्या समुद्रकिनाऱ्याचे उदाहरण देऊन स्वच्छतेसाठी सर्वांना प्रेरित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) 'मन की बात' कार्यक्रमाच्या 90 व्या भागात रेडिओवरून जनतेला संबोधित केले आहे. इतर गोष्टींबरोबरच, पंतप्रधानांनी कार्यक्रमाद्वारे लोकांना स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी प्रेरित करण्यासाठी अनेक उदाहरणे दिली.

पीएम मोदी यापूर्वीही 'मन की बात' कार्यक्रमामध्ये 'कचऱ्यातून कमाई'शी संबंधित यशस्वी प्रयत्नांची चर्चा करत आहेत. रविवारी त्यांनी मिझोरामची राजधानी आयझॉलचे देखील उदाहरण दिले. ते म्हणाले की, ऐजॉलमध्ये एक सुंदर नदी आहे, तिचे नाव 'चिटे लुई' असे आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिल्याने या नदीचे रुपांतर घाणीचे व कचऱ्याचे ढीग मध्ये झाले.

MANN KI BAAT
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरचे वाराणसीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

पीएम मोदी पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ही नदी वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी स्थानिक एजन्सी, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोकांनी मिळून सेव्ह चिट लुईस नावाची योजना सुरू केली आहे. नदी स्वच्छतेच्या (Garbage) या मोहिमेमुळे कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याची संधीही यामधून उपलब्ध झाली आहे. ही नदी आणि तिच्या काठावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि पॉलिथिनचा कचरा भरला गेला होता.

नदी वाचवण्यासाठी काम करणाऱ्या संस्थेने या पॉलिथिनपासून रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच नदीतून बाहेर पडणाऱ्या कचऱ्यापासून मिझोराममधील एका गावात प्लास्टिकचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मिझोराम राज्यातील प्लास्टिक पासून बनलेला हा पहिलाच रस्ता आहे. अशाप्रकारे स्वच्छतेसोबतच विकासालाही गती मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी मिझोरामशिवाय (Mizoram) पुद्दुचेरीचेही यावेळी उदाहरण दिले. ते म्हणाले की मिझोरामप्रमाणेच पुद्दुचेरीच्या तरुणांनी त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुद्दुचेरी हे समुद्राच्या काठावर वसलेले शहर आहे. समुद्रकिनारे आणि तेथील सौंदर्य पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असतात.

MANN KI BAAT
By-polls result : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकींचे निकाल आज होणार जाहीर

पण पुद्दुचेरीच्या समुद्रकिनाऱ्यांवरही प्लास्टिकची घाण वाढत चालली होती. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांचे महासागर, समुद्रकिनारे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी रिसायकलिंग फॉर लाइफ मोहीम सुरू केली आहे. पुढे पीएम मोदी म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत कराईकल, पुद्दुचेरी येथे दररोज हजारो किलो कचरा गोळा करण्यात येतो.

पीएम मोदी म्हणाले की, असे प्रयत्न केवळ प्रेरणादायी नाहीत, तर भारताच्या सिंगल यूज प्लॅस्टिकविरोधातील मोहिमेला चालनाही देत आहेत. पुढे ते म्हणाले की, आपले वातावरण स्वच्छ राहिल्यास, आपले पर्वत, नद्या, महासागर स्वच्छ राहिल्यास आपले आरोग्यही चांगले राहणार आहे.

'मन की बात' कार्यक्रमाचा 90 वा भाग रविवारी प्रसारित झाला आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी अर्ध्या तासाच्या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधत असतात. दरवेळेप्रमाणे हा भागही आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला आहे. 'मन की बात' कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com