''कोरोनाबाबत देशातील जनता अधिक निष्काळजी झाली आहे''

''कोरोनाबाबत देशातील जनता अधिक निष्काळजी झाली आहे''
MODI

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोनासंदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनता अधिक निष्काळजी झाले असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोनाशी संबंधित खबरदारीचे नियम पाळण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी जनतेला केले. याशिवाय कोरोनाची नवीन प्रकरणे वाढतच चालल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी पुढे सांगितले. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या चाचणीमुळेच नव्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करत हाच एकमेव रस्ता असल्याचे ते म्हणाले. 

याशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण चाचणीपैकी 70 टक्के हे आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाण असल्याचे सांगितले. परंतु केवळ चाचणी दरात वाढ करून सकारात्मकता दर 5 टक्क्यांच्या खाली आणला जाऊ शकतो, असे त्यांनी पुढे अधोरेखित केले. बर्‍याच ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी योग्य पद्धतीने न केल्याची माहितीही समोर आली होती. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. यानंतर, मागील कोरोनाच्या लाटेतील जास्तीत जास्त असणारा आकडा देखील आपण ओलांडला असून, काही राज्यात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील देशांनी लसीकरणासाठी जे निकष ठरवले आहेत, तेच निकष भारतातही ठरवण्यात आल्याचे सांगितले. त्याशिवाय, आपल्याकडे जी लस उपलब्ध आहे  त्यालाच प्राथमिकता देणे गरजेचे असल्याचे मत पुढे त्यांनी मांडले. आणि लस वाया घालविणे थांबविणे महत्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच पीएम मोदी यांनी 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले.

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती निमित्त 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान लसीकरण उत्सव करू शकत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी जास्तीत जास्त पात्र लोकांना लस देण्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर, कोरोनामुळे जनता वैतागली असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईत सुस्तपणा येऊ देऊ नये, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com