‘मला कोणी मोमोजही खाऊ घालत नाहीत..’ वाचा कोण म्हणतंय असं

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

कोरोनाचा फटका बसलेले पदपथावरील छोटे व्यावसायिक व फिरत्या विक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी केंद्र सरकारने २ जूनपासून सुरू केलेल्या पंतप्रधान ‘स्ट्रीट व्हेंडर स्वनिधी’ योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.​ 

नवी दिल्ली- ‘‘ मी वाराणसीला आलो तर कोणी मला तेथील प्रसिद्ध मोमजही खाऊ घालत नाहीत..’’ अशी प्रेमळ तक्रार कोण्या सामान्य काशीवासीयाने नव्हे तर गेली ६ वर्षे वाराणसीचे खासदार असलेल्या साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कोरोनाचा फटका बसलेले पदपथावरील छोटे व्यावसायिक व फिरत्या विक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी केंद्र सरकारने २ जूनपासून सुरू केलेल्या पंतप्रधान ‘स्ट्रीट व्हेंडर स्वनिधी’ योजनेच्या लाभार्थ्यांबरोबर त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

काँग्रेससह विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘‘ गरिबांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांच्या काळात देशात असे वातावरण तयार केले गेले की गरिबाला कर्ज दिले तर तो ते परत करणारच नाही. मात्र आमच्या देशातील गोरगरीब आत्मसन्मान व प्रामाणिकपणाशी कधीही तडजोड करत नाही व करणारही नाही.’’

 
 

संबंधित बातम्या